HW News Marathi
राजकारण

भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत काय? | राज ठाकरे

मुंबई | रंगशारदा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला राज ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

मागे मुंबईतील एका सभेच्या वेळी राज यांच्या सभेच्या वेळी बऱ्याच कार्यकर्त्यांनी लाईट गेल्याची तक्रार केली होती हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी महावितरणच्याअधिकाऱ्यांवर निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले,मी आज फार बोलणार नाही.

मला जे बोलायचं आहे ते गुढी पढाव्याच्या दिवशी जी सभा होणार आहे त्यात मी आपली भूमिका मांडणार आहे. मात्र पदाधिकाऱ्यांनी या सभेचा आगोदरच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून ठेवा जेणेकरून लाईट घालवली जाणार नाही. एवढं करूनही जर लाईट गेलीच तर लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा असा आदेश ठाकरे यांनी दिला.

आपण जी सदस्य नोंदणी करत आहोत ती इतर राजकीय पक्षांसारखी बोगस करायची नाही. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकून काही होणार नाही. आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदस्य नोंदणी मोहीमेचा शुभारंभ करताना भाजपाला चिमटा काढला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेेंयचा पराभव

Aprna

…अन् आम्ही गुन्हेगार नसताना आमचे नाव ईडीत येते !

News Desk

आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय हा पॉलिटिकल स्टंट !

News Desk