Site icon HW News Marathi

“बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमले नाही ते…,” रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

मुंबई | “बाळासाहेब असताना जे शरद पवार यांना जमले नाही. ते उद्धवजींना सोबत घेऊन शरद पवारांनी डाव साधला,” असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी केला आहे. रामदास कदम यांनी पक्षाच्या नेतेपदाचा काल (18 जुलै) राजीनामा दिला. यानंतर शिवसेने पत्र प्रसिद्ध करत रामदास कदम यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे त्यात नमुद केले होते. या पार्श्वभूमीवर रामदास कदम यांनी ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर शिवसेना संपवण्याचा आरोप केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत असताना रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले. परंतु, रामदास कदम यांच्या मुलाखतीने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

रामदास कदम म्हणाले, “आज आपल्या माध्यमातून उद्धवसाहेबांना मी सांगेन की, साहेब ज्या बाळासाहेबांनी उभेआयुष्य राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत संघर्ष करून हिंदुत्व उभे केले. अख्या जगात हिंदुहृदयसम्राट म्हणून पदवी मिळवली. त्या बाळासाहेबांनी उद्धवजींना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन मुख्यमंत्री होऊ दिले असते का?, मी उद्धवजींना सांगितले होते की, हे पाप आहे. साहेबांच्या आत्म्याला शांती लागणार नाही. शरद पवार शेवटी शिवसेना फोडायला यशस्वी झाले. शरद पवार यांचा डाव यशस्व झाला. बाळासाहेब असताना जे शरद पवार यांना जमले नाही. ते उद्धवजींना सोबत घेऊन त्यांनी डाव साधला. नशीब हे अडीच वर्षात घडले, अशीच पाच वर्ष गेली असती, तर शिवसेना सगळी संपली असती. एक आमदार निवडून नसता आला. उद्धवजी आपण हे लक्ष्यात घ्या. हकालपट्टी करण्यापेक्षा भविष्यामध्ये कसे एकत्र येता येईल. भविष्यामध्ये एकनाथ शिंदेला कसे एकत्र आणता येईल. भविष्यात गेलेल्या आमदार, खासदार, नगरसेवकांना कसे आणता येईल. आणि शिवसेना प्रमुखांचा हा बाल्लेकिल्ला आपल्याला आबादीत कसा ठेवला येईल. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे मला वाटते.”

 आमदार, नेता आणि शिवसैनिकांवर राजीनामा देण्याची वेळ का येते?

“मराठी मानसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना, या घोष वाक्यातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. आणि मागील 52 वर्ष कामदास कदम शिवसेनेनेसाठी संघर्ष करतोय. याला अनेक गोष्टी साक्षिदार आहेत. या गोष्टीला महाराष्ट्रातील शिवसैनिक साक्षिदार आहेत. जितक्या महाराष्ट्रात दंगली झाल्यात तिथे रामदास कदम पोहोचलाय. छगन भुजबळ फुटले तेव्हा रामदास कदमने संघर्ष केला. नारायण राणे फुटले तेव्हा रामदास कदमने संघर्ष केला. राज ठाकरे फुटले तेव्हा रामदास कदमने संघर्ष केला. आणि उद्धवसाहेब जेव्हा नारायण राणे गेले ना, तुम्ही मातोश्रीमधून बाहेर पडल्यानंतर तुमच्या गाडीच्या पुढच्या सिटवर हा रामदास कमद बसलेला असयाचा. थोडीशी आठवण ठेवा. हकालपट्टी तुम्ही केली नाही, आहो, माझ्या मनातून मी तुम्हाला काढले आणि राजीनामा फेकला. माझ्यावरती 52 वर्ष काम करणाऱ्या एका नेत्यावरती, आमदारावती आणि एका शिवसैनिकांवरती राजीनामा देण्याची वेळ का येते?, याचे उद्धवसाहेब तुम्ही आत्म परिक्षण केले पाहिजे, असे मला वाटते,” असे रामदास कदम म्हणाले.

एकनाथ शिंदेंनी शिवसेना वाचविली

रामदास कदम म्हटले “एक गोष्ट मी आज आपल्या माध्यमातून उद्धवजींना मुद्दामुन सांगेन की, उद्धवसाहेब मी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासबोत जे 51 आमदार गेलेत. त्यांचे मी मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी शिवसेना वाचविली. आम्ही टाहो करू सांगितले होते, मी सांगितले होते की, साहेब अजित दादा सकाळी 7 वाजल्यापासून मंत्रालयात जावून बसत आहेत. 100 राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कसे निवडून आणायचे याचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे. आणि शिवसेनेचे जिथे जिथे आमदार आहेत. आणि तिथे राष्ट्रवादीचा माजी आमदार तेथे पडलेला आहे. त्याला ताकद देऊन शिवसेनेचा आमदार कसा संपवायचा. हे कटकारस्थान शरद पवार आणि अजित पवार यांनी गेल्या अडीच वर्षात केले. यात ते जवळ जवळ यशस्वी झाले. मी आभ्यास केलाय, सर्वे केलाय, मी माहिती घेतलीय, आज एकनाथ शिंदे आणि सर्व आमदारांनी निर्णय घेतला नसता. तर पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे दहा आमदार देखील निवडून नसते आले. मी दाव्याने सांगतोय, जबाबदारने बोलतोय, मी अनेक वर्षापासून पक्षात काम केले आहे. उद्धवसाहेब तुमची तब्यात ठिक नव्हती. कोरोना होता मान्य. पण, शरद पवार कोकणात पक्ष कसा फोडतात कोकणामध्ये मी तुम्हाला फोटो सकट पाठविले होते. मी तुम्हाला सर्व पाठविले होते. कुनबी समाजाला शिवसेनेतून फोडून त्यांना पक्ष त्यानी पाच-पाच कोटी रुपये दिले. मुख्यमंत्री तुम्ही, शासनाचे फंड आणि शिवसेना फोडतायत शरद पवार हे मी तुम्हाला कागद पत्रासह दाखविले होते. आमदार सगळे सांगतात, दाखवितात. पण तुम्ही शरद पवारांना सोडत नाही. पक्ष संपला चालेल, आमदार गेले चालेल, खासदार गेले चालतील. पण शरद पवारांना सोडायचे नाही.”

 

Exit mobile version