Site icon HW News Marathi

“नुसती दाढी वाढवून काय फायदा ? लग्न तर करून बघा…”, रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला

मुंबई | “नुसती दाढी वाढवून काय फायदा? लग्न तर करून बघा”, असा टोला शिंदे गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी शिवसेनेचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना लगावला आहे. रामदास कदम यांनी त्यांचे चिरंजीव योगेश कदम यांचा मतदारसंघ असलेल्या दापोली मतदारसंघात काल (18 सप्टेंबर) सभा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर तोफ डागली.

 

यासभेत रामदास कदम म्हणाले, “आमचे उद्धवसाहेब सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची भांडी घासतायत आणि त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे टुणटुण टुणटुण खोका, खोका करत उड्या मारत म्हणत पुढे पळतोय. आता हा म्हणतोय बोखा आणि नाव घेतोय खोका. एकदा लग्न करून बघ मग बायको आल्यानंतर संसार कसे आहे ते कळेल, नुसती दाढी वाढवून काय फायदा? मग खोके काय असतील ते कळेल ना.”

 

काकाच्या पाठीत खंजीर खुपसले

“मी जेव्हा पर्यावरण खात्याचा मंत्री असताना दोन  वर्ष ते माझ्या सोबत शासकीय बैठकीत अधिकार नसताना येईचा. आणि मग एक दिवस असा आला की, मंत्रिमंडळ झाले. यात मंत्रिमंडळात बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंत्री आणि मला काका काका म्हणायचे आणि काकाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि ठूम करून बसला याला गद्दारी म्हणाता,” अशी टीका रामदास कदम यांनी म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जे कमवले, उद्धव ठाकरेंनी ते गमावले आणि सर्व काही संपवून टाकले, अशी टीका त्यांनी केली.

 

Exit mobile version