HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

माझी पत्नी आरएसएसमध्ये कधी गेली ?

मुंबई | मुसळधार पावसामुळे राज्यात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी असंख्य हात पुढे सरसावत आहेत. प्रत्येक जण यथाशक्ती मदत करत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील नुकताच आपण पूरग्रस्तांना मदत केल्याचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टमुळे संघ आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. कारण, संघाचा आपण पूरग्रस्तांना मदत केल्याचा दावा, पूर्णपणे फोल ठरला आहे. कारण, संघाने पोस्ट केलेला तो फोटो खरंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मदतकार्याचा आहे. इतकेच नव्हे तर या फोटोमध्ये जयंत पाटील यांच्या पत्नी दिसत आहेत.

जयंत पाटील यांनी स्वतः हा प्रकार उघडकीस आणला आहे. “संघाने टाकलेला तो फोटो पाहिल्यानंतर थोडा वेळ मलाच आश्चर्य वाटले कि माझी पत्नी संघात कधी गेली ?”, अशी गंमतीदार प्रतिक्रिया देखील जयंत पाटील यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या फोटोमार्फत असा दावा करत आहे कि त्यांनी पूरग्रस्तांसाठी स्वयंपाक बनवला. परंतु, संघाचा हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. कारण, तो फोटो जयंत पाटील आणि त्यांच्या पत्नीने राबविलेल्या मदतकार्याचा आहे.

Related posts

अयोध्येचा प्रश्न कश्मीरसारखा बनू नये !

News Desk

डी. के. जैन राज्याचे नवे मुख्य सचिव

नीरव मोदीचा अलिबागमधील बंगला जमीनदोस्त

News Desk