Site icon HW News Marathi

तुम्ही कधी आमदार फोडलेत का?, या प्रश्नावर पंकजा मुंडे म्हणाल्या…

मुंबई | झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी नुकतीच हजेरी लावली. या कायक्रमात पंकजा मुंडेंनी अनेक राजकीय प्रश्नांवर बेधडक उत्तर दिली आहे. यावेळी तुम्ही कधी आमदार फोडलेत का?, असा प्रश्न सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी पंकजा मुंडेंना विचारल्यावर त्यांनी यादी सांगितली, “होय, असे लिहिलेला बोर्ड उसला. या कार्यक्रमात मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. ‘बस बाई बस’ (Bus Bai Bus) मधील पंकजा मुंडेंनी हजेरी लावलेला कार्यक्रम उद्या (13 ऑगस्ट) रात्री 9.30 वाजता प्रक्षेकांना झी मराठी वाहिनीवर पाहाता येणार आहे.

तुम्ही कधी आमदार फोडलेत का?, असा प्रश्न सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी पंकजा मुंडेंना विचारल्यावर त्यांनी यादी सांगितली, “होय, असे लिहिलेला बोर्ड उसला. त्यावर सुबोध भावे म्हणाले कोण, कोण आणि कधी असा प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, “आता सगळे सांगितले तर एक तास वेगळा एपिसोड घ्यावा लागेल, असे असत उत्तर दिले. यावर सुबोद भावे म्हणाले, आम्हाला चालेल आमच्याकडे खूप वेळ आहे. पंकजा मुंडे पुढे बोलल्या की, “आज अनेक लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माझ्या जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अनेक लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजकारणाच्या ज्या पदावर मी काम करते. मला बाबांनी एक वक्य नेहमी सांगितले, बेरजेचे राजकारण करायचे वजाबाकीचे नाही. त्यामुळे आपल्याकडे बेरीज होत असेल, राजकारणा आणि युद्धामध्ये जिंकने महत्वाचे असते. अशा परिस्थितीमध्ये काही आपल्याला शोभेल अशी लोक घेण्याचा मी तरी प्रयत्न करते. मी माझ्या बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा यांना आमदार केलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस यांना घेतले. तसे तर आमच्या कडचे जास्त लोक हे इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट चालत असते.

पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नाही, पंकजा मुंडेंनी व्यक्त केली खंत  

“पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिले नाही. परंतु, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते मंत्रिपद देतील,” अशी खंत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. नुकतेच शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात शिंदे गटातील 9 तर भाजपचे 9 एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. याआधी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी भाजपने उमेदवारी नकारली आहे. दरम्यान,  मंत्रीपदासाठी वरिष्ठांची थेट भेट घ्या, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिला.

 

 

 

Exit mobile version