HW News Marathi
राजकारण

‘कुठे आहेत नोकऱ्या?’ गडकरींना कॉंग्रेस अध्यक्षांचा सवाल

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री मंत्री नितीन गडकरी यांनी आरक्षणावर बोलताना कुठे आहेत नोक-या असा प्रश्न उपस्थित केला होता. गडकरींच्या या प्रश्नाला कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. कुठे आहेत नोक-या हा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिक विचारत आहे असा टोला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. महाराष्ट्रामध्ये आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाची मागणी अन्य समाजांकडूनही होत आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे पत्रकारांनी शनिवारी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी म्हणाले होते की, एक क्षण असे समजू की या सर्वांना आरक्षण दिले पण सध्या नोक-याच उपलब्ध नाहीत. माहिती तंत्रज्ञानामुळे बँकेतील नोक-या कमी झाल्या आहेत. सरकारी पदांसाठी होणारी भरतीही थांबली आहे. त्यामुळे कुठे आहेत नोक-या अशी अवस्था आहे.

गडकरींच्या या वक्तव्याचा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून गडकरींना लक्ष केले आहे. प्रत्येक भारतीय नागरिक हाच प्रश्न विचारत आहे. गडकरींच्या उद्गारांची वृत्तपत्रात प्रसिद्ध बातमीही या टिष्ट्वटसोबत त्यांनी जोडली आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासंदर्भात नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारात जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता मात्र त्यांना सत्तेत आल्यापासून आतापर्यंत अजिबात करता आलेली नाही अशी टीका काँग्रेसकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यामुळे सहजपणे केलेले विधान नितीन गडकरींना सोशल मिडीयामुळे चांगलेच महागात पडल्याचे पहायला मिळत आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्टॉलच्या वादातून शिवसैनिकांनी केली उत्तर भारतीय तरुणाला मारहाण

News Desk

राहुल गांधीच्या जॅकेटवरून राजकारण तापले

News Desk

पंतप्रधान मोदींची पहिलीच पत्रकार परिषद, मात्र पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीच

News Desk