HW News Marathi
राजकारण

“म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 सुरू,” संजय राऊतांची टीका

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने राष्ट्रीय कार्यकारणी यादी जाहीर केली आहे. यानंतर अवघ्या काही क्षणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतून पत्रकार परिषदे घेऊन शिंदे गटावर घाणाघाती हल्ला केला. “जे वृत्त माध्यमातून दाखवण्यात आले. ते म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 सुरू आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिझन 1 हे विधीमंडळात दिसला आहे,” अशा टीका राऊतांनी शिंदे गटाच्या कार्यकारणीवर केली आहे

संजय राऊत म्हणाले, “बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेनेतून फुटून वेगळा गट तयार झाला आहे. तो गट मुळात राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त कसे करू शकतो? हे मोठे हास्यास्पद आहे. लोक सर्व पाहात आणि लोक यांची मचा घेत आहेत.  जे वृत्त माध्यमातून दाखवण्यात आले. ते म्हणजे कॉमेडी एक्सप्रेस सिझन 2 आहे. कॉमेडी एक्सप्रेस सिझन 1 हे विधीमंडळात दिसला आहे.”

शिंदेची मुख्यमंत्री पदाची शपथ बेकायदेशीर

“शिवसेना हा एक नोंदणीकृत राजकीय पक्ष असून अनेकांनी पक्षातून फुटून जाणून गट निर्माण केला असला. तरी त्या गटाला कोणताही अधिकार राहिलेला नाही. या सर्वांचा शिवसेनेवर परिणाम होणार नाही.  जर लोकसभेत असा कोणी प्रयत्न करेल तर कायद्यांच्या भाषेत आम्ही त्यांना उत्तर देऊ,” असेही राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले. “मुख्यमंत्र्यांच्या डोक्यावर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ बेकायदेशीर आहे,” असा टोलाही राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

संबंधित बातम्या

Related posts

Chhattisgarh Assembly Elections 2018 : ७० टक्के जनतेने केले मतदान

News Desk

धनगर आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, पुन्हा आंदोलनाचा इशारा

News Desk

उपेंद्र कुशवाह यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

News Desk