HW News Marathi
राजकारण

“मोदीजी कमनशिबी कोण? तुम्ही की जनता?”; नवाब मलिकांचा बोचरा सवाल

मुंबई | पेट्रोल व डिझेल आणि सीएनजी, एलपीजी यांचे भाव गगनाला भिडले आहेत. याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मेरे नशीबसे दाम कम हो रहे है”, असं म्हणणारे पंतप्रधान मोदी आता कुणाच्या नशीबाने भाव वाढत आहेत. तुमच्या नशीबाने की जनतेच्या नशीबाने? कोण कमनशिबी आहे? देशातील जनता की तुम्ही? उत्तर द्या मोदीजी”, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात झालेल्या इंधन दरवाढीनंतर राष्ट्रवादीकडून थेट पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली आहे.

देशात पेट्रोल – डिझेलच्या मुद्दयावर भाजपने निवडणूक लढवली. ‘अब की बार मोदी सरकार’ म्हणत सत्तेवर आल्यानंतर काही काळात भाव कमी केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोदींनी ‘मेरे नशीबसे दाम कम हो रहे है तो विपक्ष को क्यू बुरा लगता है आपको नसीबवाला चाहिए की बदनसीबवाला चाहिए?’ असं बोलून विरोधकांना डिवचलं होतं. दरम्यान हाच मुद्दा पकडून आता नवाब मलिक यांनी थेट नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे, राज्यातील भाजपकडून याला काही प्रत्युत्तर येणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आज पेट्रोल-डिझेलचा दर काय?

देशभरात रविवारी (१७ ऑक्टोबर) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. नव्या दरानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी ३५ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. नव्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर १११.७७ रुपये तर डिझेलचा प्रतिलिटर दर १०२.५२ रुपये इतका झाला आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०५.८४ रुपये आणि ९४.५७ रुपये इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अन् राहता राहिला प्रश्न शरद पवारांचा तर…!

News Desk

मंत्री महादेव जानकर यांना दिलासा

News Desk

राफेल डीलची ऑडिओ क्लिप खरी | राहुल गांधी

News Desk