Site icon HW News Marathi

न्यूज चॅनेलमधील मुलींसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

मुंबई | “न्यूज चॅनेलमधल्या मुली साडी का नेसत नाहीत?”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या ४३व्या राष्ट्रीय अधिवेशनात बोलताना केले आहे. सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. यात भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ त्यांच्या टिट्वरवर शेअर केला आहे. यापूर्वी

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “न्यूज चॅनेलमधील मुली साडी का नेसत नाहीत?, त्या शर्ट आणि ट्राऊजर का? घातलात. मराठी भाषा बोलताना तुम्ही, मराठी संस्कृतीसारखे कपडे आपण का नाही घालत?, म्हणजे आपण सगळ्या गोष्टींचे वेस्टनाईज करतो. केवळ दिवाळीत तयार होऊ येता, नियम फक्त आम्हालाच आहेत का?, फॅशन आयकॉन तुम्ही नाहीत आणि आम्ही नाहीत,” असे अनेक सवाल त्यांनी केले आहे. चित्र वाघांनी सुप्रिया सुळेंचा व्हिडिओ ट्वीटवर शेअर करत म्हणाले, “‘टिकली’वर टीका करणारे ‘साडी’वर या नेत्यांना सोलणार का..? चला तुमची परीक्षा एकदा होऊन जाऊ द्या!”, अशी कॅप्शन दिली आहे.

टीकेनंतर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

यानंतर सुप्रिया सुळेंनी त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण देत म्हणाल्या, “माझे भाषण सुरू होण्यापूर्वीच तिथे एक व्यापक चर्चा सुरू होती. त्या चर्चेला उद्देशून मी कार्यक्रमात अनेक मुद्दे मांडले. कोणी काय घालावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हे सुद्धा मी त्यावेळी म्हटले होते. यामुळे सर्वांनी माझे संपूर्ण भाषण ऐकावे, माझे भाषण 35 मिनिटाचे भाषण 17 सेकंदात दाखवण्यात येणार असेल तर काय बोलणार?”, असा सवाल त्यांनी टीका करणारांना केला.

 

 

 

Exit mobile version