HW News Marathi
राजकारण

शरद पवार ‘माढा’ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार ?

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील याबद्दल अनेक दिवस राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होत होत्या. दरम्यान, या चर्चांना आता पूर्णविराम लागण्याची शक्यता आहे. शरद पवार हे ‘माढा’ मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. आज (१३ फेब्रुवारी) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीत याबाबतची अधिकृत घोषणा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी देखील शरद पवारांची आपला मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, “शरद पवार जर माढा मतदारसंघातून उभे राहिले तर भाजप त्यांचा पराभव करेल. आमची संघटनात्मक रचना अशी आहे की आम्ही शरद पवारांचा पराभव करु शकू. मात्र जर ते बारामतीत उभे राहिले तर आम्हाला कठीण आहे”, असे वक्तव्य काहीच दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही बारामतीत कमळ फुलवू, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांच्या सुनावणीदरम्यान PMLA न्यायालयाने ‘या’ कारणामुळे ED ला फटकारले

Aprna

“पंतप्रधान मोदी नीच” या आपल्या वक्तव्यावर मणिशंकर अय्यर ठाम

News Desk

राज ठाकरे, विश्वजीत कदम एकत्र

swarit