Site icon HW News Marathi

भावना गवळी यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई | यवतमाळच्या खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांचे घटस्फोटीत पती प्रशांत सुर्वे (Prashant Surve) यांनी आज शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला आहे. भावना गवळी यांचे पती शिवसेनेत  दाखल झाल्यामुळे त्यांना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सुर्वेंनी आज (28 जुलै) मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत हाता शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला आहे.

भावना गवळी या घटस्फोटानंतर राजकारणात सक्रीय झाल्या आहेत. परंतु, सर्वे हे आधीपासूनच राजकारणात सक्रीय नव्हते. पण, राज्यातील सत्तासंघर्षानंतर भावना गवळींनी शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर सुर्वेंनी शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत प्रवेश केल्यानंतर सुर्वे माध्यमांशी बोलताना म्हणाले, “भावना गवळी या शिंदे गटात दाखल झाल्या आहेत. याबद्दल मी फार काही बोलणार नाही. परंतु, त्या वाशिमच्या खासदार असून आमच्यात जे नाते होते, ते 10-12 वर्षापूर्वीच संपले आहे. सध्या मी आणि माझे कुटुंब वाशिममध्ये राहतो. माझ्या सेवेतील मोठा काळ हा दिल्ली आमि मुंबईत गेला आहे. यामुळे मी माझे मूळ वाशिमचा असल्याने आमची शेतीवाडी आणि व्यवसाय येथे आहे.”

 

 

 

 

Exit mobile version