HW News Marathi
राजकारण

“तुम्ही याआधी यात्रा-भेटी का नाही घेतलात?,” दीपक केसरकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई | “सर्व कार्यकर्ते निघून जातील म्हणून तुम्ही यात्रा काढताय. तुम्ही याआधी यात्रा-भेटी का नाही घेतलात?,” असा टोला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे नेते आणि माजी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. केसरकरांनी आज (22 जुलै) मनमाडमध्ये पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंवर टीका केली.

केसरकर म्हणाले, “शिंदेंनी लढा दिल्यामुळे 5 वर्ष सत्तेमध्ये शिवसेना राहिली आहे. शिंदे चुकीचे आहेत, असे तुम्ही म्हणताय. तुम्ही तुमची भूमिकेसोबत राहाला असून लोकांमध्ये दिशाभूल करू नका. तुम्हाला वाटते की, सर्व कार्यकर्ते निघून जातील म्हणून तुम्ही यात्रा काढताय. तुम्ही याआधी यात्रा-भेटी का नाही घेतलात?, तेव्हा सर्व सामान्य शिवसैनिकांचा अपमान करू नका. आदराने आम्ही  बोलतो तर तुम्ही पण आगदराने बोलवा, कृपया करून शिवसैनिकांची दिशाभूल करू नका,”

“आदित्य ठाकरे निम्म्या वयाचे आहात. मात्र, तरीही आम्ही तुम्ही आले की खुर्चीवरून उठतो कारण त्यांच्या आजोबांना आम्ही मान देतो. आणि तुम्ही त्यांचे नातू आणि शिवसैनिक आहात. पण, बाळासाहेबांनी आमच्या रक्तात शिवसेना भिनवली आहे. कट्टर शिवसैनिकांची बदनामी कशाल करता. ज्या शिवसैनिकांनी शिवसेना उभी केली,” असे केसरकर म्हणाले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी हेमंत करकरे यांना म्हटले होते की त्यांचा सर्वनाश होईल !

News Desk

सुंदर चेहऱ्यांमुळे मते मिळत नाहीत !

News Desk

शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर केल्या ‘या’ तीन महत्वाच्या घोषणा

Aprna