HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

“ए तू चूप”, चंद्रकांत पाटलांची पूरग्रस्तांना दमदाटी

मुंबई | राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका आज सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला बसला आहे. या तिन्ही जिल्ह्यात निर्माण झालेली गंभीर पूरस्थिती आणि त्यामुळे इथल्या लोकांचे झालेले हाल याची नुसती कल्पना जरी केली तरीही कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या अंगावर काटा येईल. मात्र, इतक्या भीषण परिस्थितीत सातत्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी दाखवलेली असंवेदनशीलता संतापजनक आहे. थोड्याच दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त सेल्फी व्हिडिओनंतर आता भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील संतापजनक कृत्य केले आहे.

चंद्रकांत पाटील हे पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी पूरग्रस्तांच्या आक्रोशाला, प्रश्नांना, समस्यांना समजून न घेता चंद्रकांत पाटील यांनी चक्क चिडून “ए तू चूप” असे म्हणत एक प्रकारे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे पूरग्रस्तांना माहिती देण्याच्या, आधार देण्याच्या उद्देशाने गेलेल्या चंद्रकांत पाटील यांनी देखील तेथे जाऊन मात्र आपल्या असंवेदनशीलतेचेच दर्शन घडविले.

सत्ताधाऱ्यांचा संयम सुटायला हवा कि पुरग्रस्तांचा ?

“शिरोलीमधून रोड सुरु झाला, तर आपल्याला जे हवं ते आणता येईल. म्हणून मी आपल्याला प्रार्थना करेन की आपण विचलित न होता, न घाबरता या परिस्थितीला सामोरे जा. सरकार आपल्या पाठिशी आहे, याची खात्री बाळगा. आपण सर्व नीट करु. तक्रारी करुन काही होणार नाही. तुम्ही प्रशासनाला सूचना करा”, असे चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील बोलत असताना पुरग्रस्ताने आपली तक्रार मांडल्यानंतर ‘आपण सगळं करू’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, त्यानंतरही पूरग्रस्तांना तक्रार करणे सुरूच ठेवल्याने चंद्रकांत पाटील यांचा संयम सुटला. त्यामुळे, गेले अनेक दिवस इतक्या भीषण पूरस्थितीचा सामना केल्यानंतर त्या पुरग्रस्तांचा संयम सुटायला हवा कि सत्ताधाऱ्यांचा ?, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Related posts

शिवस्मारक ठरणार जगातील सर्वात उंच स्मारक

आमच्या उमेदवारांचा पराभव काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच !

News Desk

राष्ट्रवादीचे सरकारविरोधात २ ऑक्टोबरला राज्यभर मौनव्रत धारण करत आंदोलन…

News Desk