HW News Marathi
राजकारण

“कोणते आमदार तुमच्या संपर्कात आहेत, नावे जाहीर करा,” एकनाथ शिंदेंचे शिवसेनेला ओपन चॅलेंज

मुंबई | “कोणते आमदार तुमच्या शिवसेनेने त्यांच्या संपर्कात आहेत, त्याची नावे तुम्ही जाहीर करावी,” असे ओपन चॅलेंज शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला केले आहे. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली असून ते सध्या गुवाहाटीच्या रॅडिसन हॉटेलमध्ये 50 आमदार मुक्कामी आहे. शिंदे हे आज (28 जून) अचानक हॉटेल परिसरात फेर फटका मारत होते. शिंदेंनी हॉटेलच्या परिसरातून माध्यमांशी संवाद साधला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “प्रत्येक जो आमचा स्टेंट आणि आमची भूमिका आहे, आमच्या प्रवक्त्यांच्या माध्यमांतून आपल्याला मिळेल. तुम्ही निश्चित राहा, काळजी करू नका. इथे सगळे लोक अगदी आनंदात आहेत. जी माहिती बाहेरून येते की, आमच्या बरोबर ऐवढेसंपर्कात आहेत. तेवढे संपर्कात आहेत. कृपया त्यांनी नावे सांगावी, मग त्यांची स्पष्टता या ठिकाणी येईल. यामध्ये खोटी माहिती दिशा भूल करण्याचे काम समोरचे लोक (शिवसेना) करत आहे. त्यामुळे त्यावर कोणी विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही. येथे 50 लोक आहेत. हे 50 लोक स्वत:च्या इच्छेनी आले आहेत. ते खूश आणि आनंदी आहेत. आम्ही एक भूमिका घेऊन आलेलो आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये स्वत:च्या स्वार्थासाठी येथे 40-50 लोक आलेले नाही. हिंदुत्वाची भूमिका आणि बाळासाहेबांची भूमिका घेऊन याठिकाणी लोक आलेले आहेत. त्यामुळे पुढचीच माहिती आहे. ही दिपक केसरकर आपल्याला देतील.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुलाबराव पाटील यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Aprna

उदयनराजेंच्या भाजपप्रवेशानंतर आज प्रथमच शरद पवार साताऱ्यात

News Desk

फडणवीस पवारांची राजकीय जुगलबंदी

News Desk