Site icon HW News Marathi

“युवराजांची कायमच ‘दिशा’ चुकली…”, अभिनेत्रीचे नाव न घेता सत्ताधाऱ्यांची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी

मुंबई | शिंदे सरकारच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विधीमंडळाच्या पायऱ्यावर सत्ताधानी शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याविरोधा आंदोलन करत घोषणाबाजी केली. सत्ताधाऱ्यांनी हाता बॅनर घेऊन आदित्य ठाकरे विरोधात घोषणाबाजी करत होते. ‘युवराजांची कायम दिशा चुकली… ‘, असे म्हणत सत्ताधारांनी बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचे नाव न घेता आदित्य ठाकरेला टोला लगावला आहे. तसेच बॅनरमध्ये आदित्य ठाकरे हे घोड्यावर उलट्या दिशेन बसलेले व्यंगचित्र झळकत आहे. ‘महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज’ असे शीर्षक दिले आहे.

या बॅनरमध्ये लिहिले की, ‘महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज’ सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी बॅनर झळकवित होते. या बॅनमध्ये आदित्य ठाकरे हे घोड्यावर उलटे बसलेले असून हा घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य ठाकरे घोड्यावर उलटे बसलेले असून महाविकास आघाडीच्या दिशेने बोट दाखवित आहे. या बॅनरच्या शेवटी ‘युवराजांची कायमच दिशा चुकली…’, असे लिहेले आहे. ‘दिशा’ला सत्ताधाऱ्यांनी अधोरेकीत करत, त्यांनी नाव न घेता बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानींवरून टोला लगावला. आदित्य ठाकरेचे नाव दिशा पटांनीसोबत जोडले गेले. या आदित्य ठाकरे आणि दिशा दोघांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आणि या दोघांचा वाढदिवस देखील एकाच दिवशी असून या दोघांच्या डेटीच्या चर्चा रंगल्या होत्या.

बॅनरमध्ये नेमके काय म्हणाले

‘महाराष्ट्राचे परम पुज्य (प पु) युवराज’

या बॅनरमध्ये 2014 ला 151 चा हट्ट धरून युती बुडवली !

2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली !!

पर्यावरण खाते घेऊन घरातच बसून केला कहर !

सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर

पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन

स्वत: आमदार व्हायला महापौर व दोन MLC चे लागते कुशन

खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार

सत्ता गेल्यावर आता फिरतात दारोदार

जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही

तुमच्या या खोट्या रडण्यावर भुलणार नाही

युवराजांची कायमच दिशा चुकली…

विधीमंडळात मिटकरी-शिंदेंची धक्काबुक्की

 

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर काल (24 ऑगस्ट) सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकर आणि शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे या दोघांमध्ये धक्काबुक्की झाली होती. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले होते. यानंतर आज पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केले.

संबंधित बातम्या

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्तांधारीमध्ये धक्काबुक्की; अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Exit mobile version