HW News Marathi
क्रीडा

भालाफेकीत २० वर्षीय नीरज चोप्राने पटकावले सुवर्णपदक

सोतेविले | फ्रान्सच्या सोतेविले येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेतील (जेवलिन थ्रो) भालाफेकीत २० वर्षीय नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले आहे. नीरजने ८५.१७ मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली.

नीरज चोप्रा हा मूळचा हरियाणातील सोनीपत जिल्ह्यातील कांदरा गावातील आहे. नीरजचे वडील शेतकरी आहेत. नीरजने कधीच भालेफेक या खेळासाठी कोणत्याही प्रशिक्षकाकडून शिक्षण घेतलेले नाही. केवळ युट्युबवर काही व्हिडिओ पाहून त्याने या खेळातील ट्रिक्स शिकल्या. नीरज 20 वर्षीय असून कॉमनवेल्थ खेळात सुवर्णपदकाची कमाई करणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्यानंतर आता जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेतील भालाफेकीत नीरजने सुवर्णपदक पटकावले आहे.

या स्पर्धेत युरोपमधील मोलडोवा येथील अँड्रिन मार्डारेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने 81.48 मीटरवर भालाफेकला तर लिथुआनियाच्या एडिसने 79.31 मीटरवर भालाफेक करत तिसऱ्या स्थान पटकावले. या आधी राष्ट्रकुल स्पर्धेत २० वर्षीय नीरजने सुवर्णपदकाची लूट केली होती. त्याने राष्ट्रकुलच्या अंतिम सामन्यात ८६.४७ मीटरवर भालाफेक करत सुवर्णपदकाची कमाई केली होती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रणव धनावडेचा विश्वविक्रम आता सीबीएसईच्या पाठ्यपुस्ताकात

swarit

भारतीय संघाने धोनीला वगळले

News Desk

कराटे चॅम्पियनशिपमध्ये चिमुकल्या भार्गवी संखेची उत्कृष्ट कामगिरी

News Desk