HW Marathi
क्रीडा देश / विदेश

#IndiaVsPakistan : पावसाचे संकट टळले मात्र धाकधूक कायम

नवी दिल्ली | भारत-पाकिस्तान यांच्यात आज (१६ जून) मँचेस्टरमध्ये होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकप सामन्यावर ढगाळ वातावरणामुळे अद्याप पावसाचे संकट कायम आहे. मँचेस्टरमध्ये शनिवारी (१५ जून) रात्री मुसळधार पाऊस झाला आहे तर हवामान खात्याने आजही तेथे पावसाचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान, आतापर्यंत वर्ल्डकपचे ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. त्यामुळे, आज भारत-पाकिस्तान सामना होणार का ? याबाबत अजून प्रश्नचिन्ह आहेच. मात्र, खेळपट्टीवरील कव्हर्स हटविण्यात आल्याने क्रिकेटप्रेमींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मँचेस्टरमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे खेळपट्टी पूर्णपणे झाकण्यात आली होती. मात्र, आज येथील पाऊस पूर्णपणे थांबल्याने या खेळपट्टीवरील कव्हर्स आता हटविण्यात आले आहेत. त्यामुळे, अर्थातच क्रिकेटप्रेमी सुखावले आहेत. मँचेस्टर स्टेडियम बाहेर चाहत्यांनी गर्दी करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यावरील हे पावसाचे संकट सध्या जरी दूर झालेले असले तरीही इथले ढगाळ वातावरण पाहता धाकधूक मात्र अद्याप कायम आहे.

Related posts

डीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांचे निधन 

News Desk

क्राइम सीरिअल पाहून तिघांनी लुटली बँक, टॅटूवरून चोरीचा छडा

News Desk

पातळी सोडून राहुल गांधींनी टिका करू नये-सुषमा स्वराज यांचे प्रत्युत्तर 

News Desk