HW Marathi
क्रीडा

भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत १-०ने घेतली आघाडी

ऍडलेड | भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या मालिकेत पाचव्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवत १-०ने आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने या मालिकेत ३१ धावांनी विजय मिळवला आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का बसला होता. अखेर सामन्यात विक्रमी षटके टाकणाऱ्या अश्विनने जॉस हेजलवूडला बाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

चौथ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज माघारी धाडले होते. भारताने पाचव्या दिवसाची सुरुवात हेडची विकेट घेत केली. त्यानंतर अर्धशतकी खेळी करुन डोकेदुखी ठरत असलेल्या शॉन मार्शला बाद करुन कांगारुंना मोठा धक्का दिला. परंतु , कर्णधार पेनने कडवी झुंज देण्यास सुरुवात केली. त्याने कमिन्स बरोबर भागिदारी रचत भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. ४१ धावा करणाऱ्या पेनचा अडसर दूर करत ही जमू पाहणारी जोडी बुमराहने फोडली.

अखेर स्टार्कला बाद करत शमीने दिलासा दिला. त्यानंतर कमिन्सने आणि लायनने आठव्या विकेटसाठी भागिदारी रचण्याचा प्रयत्न सुरु केला. हा प्रयत्न कमिन्सला बाद करत बुमराहने हाणून पाडला. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ३१ धावांची भागिदारी रचली. त्यानंतर लयानने चिवट फलंदाजी करत भारताला अखेरची विकेट मिळवण्यासाठी घाम गाळायला लावला. अखेर अश्विनने हजेलवूडला १३ धावांवर बाद करत या शंकेचे निरसन कले.

भारताकडून शमी, बुमराह आणि अश्विनने प्रत्येकी ३ बळी मिळवले. तर इशांतने १ बळी मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाज लायन (३८), कमिन्स (२८), स्टार्क(२८) आणि लायनने (१३) यांनी २९१ धावांमधील १५० धावा करत भारताला चांगलाच घाम फोडला.

Related posts

‘सँटा’ सचिन तेंडुलकरची धमाल

News Desk

महिला क्रीडापटूंच्या यादीत एडलवाईज ग्रुपकडून धावपटू हिमा दासचा समावेश

News Desk

आशियाई क्रीडा स्पर्धा २०१८ | सांघिक नौकानयनात भारताची सुवर्ण कामगिरी

News Desk