HW Marathi
क्रीडा

संरक्षण मंत्रालयाच्या खास समितीवर MS धोनीची निवड

नवी दिल्ली | देशाच्या संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये सुधारणा करण्यासाठी एका उच्च स्तरीय तज्ञ समितीची निर्मिती केली आहे. या समितीचे अध्यक्ष खासदार बायजयंत पांडा हे असणार आहेत. समितीच्या अन्य सदस्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी आणि उद्योजक महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांचा समावेश करण्यात आला आहे. धोनीला याआधीच संरक्षण दलाने मानद कर्नलपद दिले आहे. त्याने भारतीय संरक्षण दलात एक महिना काम देखील केले आहे. आनंद महिंद्र हे देशातील आघाडीचे उद्योजग आहेत. देशाच्या सरंक्षण दलासाठीच्या शस्त्र निर्मिती कार्यक्रमात त्यांच्या समहूचा सहभाग आहे.

धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळतोय

भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार असलेल्या धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. धोनी सध्या आयपीएलमध्ये खेळतोय. तो चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार आहे. आयपीएल २०२१चे दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार असून धोनीच्या संघाची लढत रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

मोदी सरकारने NCCमध्ये अमूलाग्र बदल करण्याचे ठरवले आहे. NCCच्या विस्ताराला संरक्षण मंत्रालयाने ऑगस्ट २०२०मध्ये मंजूरी दिली होती. याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२०च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणा केली होती. देशातील तरुणांना कमी वयात सरंक्षण दलात काम करण्याचा अनुभव घेता यावा यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते.

Related posts

फुटबॉलपटू रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप

अपर्णा गोतपागर

हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सचिन तेंडुलकर प्रमुख पाहुणा

News Desk

Ind Vs Pak : भारत पाक पुन्हा एकदा आमने-सामने

अपर्णा गोतपागर