Site icon HW News Marathi

‘या’ मुद्यांवर विधान सभेचं पावसाळी अधिवेशन गाजणार?

मुंबई : 17 ऑगस्ट पासून म्हणजे उद्या पासून विधान सभेच्या पावसाळी अधिवेशनाला (Monsoon Session) सुरुवात होणार आहे. विशेष म्हणजे या अधिवेशनात आपल्याला शिवसेना सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर पाहायला मिळणार आहे. म्हणुन पावसाळी अधिवेशन अधिक वादळी ठरण्याची दाट शक्यता आहे. या अधिवेशनात अनेक मुद्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा काम करणार आहे. शिंदे फडविस सरकार बेकायदेशीर सरकार असलेच म्हणत गोंधळ होण्याची शक्यता आहे.

 

 

कोणकोणत्या मुंद्यावर अधिवेशन गाजू शकत पाहुयात

 

 

1) अतिवृषी झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांचं प्रचंत नुकसान झालं आहे. तर लवकर लवकर शेतकऱ्यांना मदत करा अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जाऊ शकते. या आधी देखिल सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून अधिवेशन गाजू शकत.

 

काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष नाना पटोले यांनी तर जय बळीराजा अशी घोषणा केली आहे म्हणुन आता शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक भूमिका पांडणार याचे संकेत नाना पटोले यांनी देलेत.

 

2) मुंबईतील आरे कर्षेदबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणार

 

3) आपण पाहिलं की शिंदे फडणविस सरकार स्थापन होताच तत्कालीन सरकारने घेतलेले अनेक निर्णय शिंदे सरकारने थांबवले. त्या निर्णयांना स्थगीती देण्यात आली. तर या मुद्यावरून देखिल गोंधळ पाहायला मिळणार

 

4) ज्या आमदारांवर आरोप होते त्यांना मंत्री मंडळात स्थान दिल्या बद्दल देखिल विरोधक आक्रमक होणार. संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांना मंत्री पद दिल्याने विरोधक गोंधळ घालणार असल्याची दाट शक्यता आहे.

 

 

अजूनही काही नविन मुद्दे विरोधक मांडणार का ? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

 

 

विशेष म्हणजे आज विरोधी पक्षनेत्यांनी बैठक पार पडणार आहे या बैठकीत पुढची रणनीती काय असणार या बतात चर्चा होणार आहे. आणि बैठकीनंतर विरोधी पक्षनेत्यांची पत्रकात परीषद होणार आहे.

 

तर दुसरीकडे नवनिर्वाचीत मंत्र्यांची आज खाते वाटपानंतर पहिली कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. 

 

अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहापान च कार्यक्रम आयोजन करान्यात आलेलं आहे. त्या नंतर बैठक पार पडणार आणि 6 वाजता पत्रकात परीषद होणार आहे.

 

एकीकडे भाजपचे नवनिर्वाचित मंत्री २.५ वर्ष सत्तेपासून लांब राहिल्यामुळे पहिल्या अधिवेशनासाठी त्यांच्यात आनंद पाहायला मिळतं आहे तर दुसरी कडे शिंदे गटातल्या मंत्र्यांवार अपात्रतेची टांगती तलवार आजही कायम आहे. अधिवेशनाच्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात अपत्रातेच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे म्हणून अधिवेशनाच्या दरम्यान भूकंप होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Exit mobile version