HW News Marathi
शिक्षण

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचा सामाजिक समतेचा विचार जनमानसापर्यंत पोहचविण्यासाठी आणि या संबंधानी अधिक संशोधन व प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची बार्टी येथे स्थापना केली. या संस्थेच्या वतीने विविध प्रशिक्षण सत्रे, उपक्रम आयोजित करण्यात येतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत अनसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी लिपीकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परिक्षेच्या पूर्वतयारीकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण (कोचिंग) वर्ग सुरु करण्यात येत आहेत.

या वर्गासाठी ५० अनुसूचित विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून त्यामध्ये ३० टक्के जागा महिलांसाठी व ३ टक्के जागा दिव्यांग असलेल्या व्यक्तींसाठी राखीव आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अनुसूचित जाती मधील उमेदवार असावा. तसेच अर्जदाराचे वय १८ ते ३५ वर्षापर्यंत आणि किमान १२वी उत्तीर्ण असावा.

हा प्रशिक्षण वर्ग १ एप्रिल २०१७ पासून सुरु होणार असून निवड झालेल्या पात्र उमेदवारांना प्रशिक्षण दरम्यान दरमहा रुपये ३ हजार विद्यावेतन व नि:शुल्क वाचन साहित्य तसेच रु. २ हजार किंमतीच्या पुस्तकांचा संच किंवा त्याऐवजी रुपये २ हजार एवढी रक्कम संस्थेमार्फत अदा करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण वर्ग एकूण सात जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत असून विहीत नमुन्यातील अर्ज व अधिक माहितीसाठी उमेदवाराने खालील नमूद केलेल्या संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

१. औरंगाबाद – राजर्षी शाहू महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, मुखेड द्वारा आयएएमई, गव्ह.पॉलिटेक्निक समोर, उस्मानपुरा – मो.क्र.९०११५२०१६७

२. औरंगाबाद – नालंदा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, प्लॉट नं.३६, गट नं.१०६, संग्रामनगर, सातारा परिसर, औरंगाबाद – मो.क्र.९४२१३२०५४८

३. हिंगोली – भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जामाठी (बु.) ता.सेनगाव, जि.हिंगोली, द्वारा संचलित ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सावके सरांची इमारत, अकोला, बायपास, हिंगोली-४३१५१३ – मो.क्र. ९७६५८५२५७४, ८६०५८६८३७०.

४. वर्धा – सुभेदार रामजी आंबेडकर एज्युकेशन सोसायटी मास्टर कॉलनी, सावंगी (मेघे), रोड, वर्धा – मो.क्र.९४२३४२१४५७

५. रत्नागिरी – सेवा सामाहित विकास संस्था, सी/ओ सेंटर फॉर क्रिएटीव्हिटी डेव्हलपमेंट, शिर्के प्लाझा बिल्डिंग, २ रा मजला, कलेक्टर ऑफिस समारे, जयस्तंभाजवळ, रत्नागिरी – मो.क्र. ८८८८४८३३५०

६. पालघर – गॉड फादर सेवाभावी व बहुउद्देशीय संस्था, शॉप क्र.१४, तळमजला, पार्क अव्हेन्युव, भक्ती वेदांत मार्ग, पालघर (पूर्व), मो.क्र. ९७६८९९८१९४, ९७६७३७४३५१

७. सिंधुदुर्ग – प्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित ‘स्पेक्ट्रम ॲकेडमी’ वारकर बिल्डींग, २रा मजला, ता.जि.सिंधुदुर्ग – मो.क्र.९८२२१९६२१७

८. भंडारा – ए.ई.जी. ॲकेडमी, अनसूचित जाती जमाती शिक्षण संस्था, भंडारा, साई मंदिर रोड, रंगारी दवाखान्याजवळ, भंडारा-४४१९०४ – मो.क्र.८९५६३११६८९, ९४२३६८९२८१

अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मार्च २०१६ असून दि. २६ मार्च २०१७ रोजी उमेदवारांची गुणानुक्रमे निवड करण्यात येणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, जातीच्या प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, तसेच १२वी व त्यानंतरची परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका प्रत व इतर शैक्षणिक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी या संस्थेमधे प्रशिक्षण घेतले असेल अशा उमेदवारांची पुन्हा नव्याने प्रशिक्षणासाठी निवड झाली तरी अशा उमेदवारांना विद्यावेतन व पुस्तक संच इ. लाभ मिळणार नाही.

संस्थेचा पत्ता –

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे

(महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था),

28, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे – 411 001.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीएसईचा २५ एप्रिलला बारावीचा पेपर फक्त दिल्ली आणि हरियाणात

News Desk

आंबेडकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी नाण्यांचे १ दिवसीय अनोखे प्रदर्शन

News Desk

छात्र भारती आक्रमक, एल्फिन्स्टन कॉलेजवर अॅट्रॉसिटी दाखल करणार  

News Desk