HW News Marathi
Uncategorized

मुंबई व परिसरात तुफान पाऊस, जनजीवन विस्कळीत

 

मुंबई- शहर व उपनगरांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. रविवारपासून पावसाची सर्वत्र धुवॉँधार बँटींग सुरू आहे. यामुळे मुंबईकरांचे हाल सुरू आहेत. दरम्यान, पुढील दोन दिवसांत संपूर्ण कोकणसह मुंबई व उपनगरांत तुफान पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मुंबईसह कोकण पट्ट्यात जोरदार पाऊस झाला. गणरायाचे आगमन झाल्यापासून पावसानेही जोरदार पुनरागमन केले आहे. आता पुढील दोन दिवसांमध्येही उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये मुंबईत मुसळधार होईल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यातदेखील जारदार पाऊस होईल, असे स्कायमेटने म्हटले. ‘येत्या २४ तासांमध्ये मुंबईत काही वेळ सतत पावसाच्या सरी कोसळतील. या कालावधीत काही वेळ प्रचंड पाऊस होईल. हा पाऊस १०० मिलीमीटरपेक्षाही जास्त असू शकतो,’ असे भाकित स्कायमेटने वर्तवले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मेट्रो’ ३ च्या संचालक अश्विनी भिडेंना राज्याच्या प्रधान सचिवपदी पदोन्नती

News Desk

थिएटरमध्ये प्रिया बेर्डे यांचा विनयभंग

News Desk

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची निर्मिती!

News Desk