HW News Marathi
Uncategorized

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५००च्या जवळ, चिंता वाढली

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या मोठ्यात प्रमाणात वाढताना दिसत आहे. आजच्या (एप्रिल ३) दिवसभरात राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६७ ने वाढला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा थेट ४९० वर जाऊन पोहोचला आहे. एकट्या मुंबईत ४३, मुंबई परिसरात १०, पुण्यात ९ तर अहमदनगरमध्ये ३ नव्या कोरोनारुग्णांची नोंद झाली आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकड्यात होणारी ही वाढ राज्यासाठी अत्यंत चिंताजनक ठरत आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचा आकडा मुंबईत असलेल्या चिंता आणखी वाढली आहे. यादृष्टीने राज्य सरकार काय पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

आजच्या एका दिवसात ६७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद

मुंबई – 43

मुंबई परिसर – 10

पुणे – 9

अहमदनगर – 3

राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 490

मुंबई – 278

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) – 70

सांगली – 25

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा – 55

नागपूर – 16

यवतमाळ -4

अहमदनगर -20

बुलढाणा – 5

सातारा -3

औरंगाबाद – 3

कोल्हापूर – 2

रत्नागिरी – 2

सिंधुदुर्ग- 1

गोंदिया – 1

जळगाव -1

नाशिक – 1

उस्मानाबाद – 1

इतर राज्य – गुजरात – 1

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जळगाव बलात्कार प्रकरणात भाजप आमदारावर आरोप तर गिरीश महाजन म्हणाले…

News Desk

परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकरांचं निधन

News Desk

काँग्रेस कार्यकारिणीने एकमताने फेटाळला राहुल गांधींचा राजीनाम्याचा प्रस्ताव

News Desk