Site icon HW News Marathi

पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांची गोळ्या झाडून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | पंजामधील अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी (Sudhir Suri) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुधीर सुरी यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. सुधीर सुरी हे आज (4 नोव्हेंबर) अमृतसरमधील मजीठा रस्त्यावरील गोपाल मंदिराबाहेर आंदोलन करत होते. यावेळी अचानक गर्दीतून सुधीर सुरी यांच्या दिशेने एक अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात सुधीर सुरी हे गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुधीर सुरी यांना उपचारासाठी जवळाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, सुधीर सुरी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पंजबात सरकारने सुधीर सुरी यांना सुरक्षा दिली होती. तरी सुद्धा सुधीर सुरी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने गोळी झाडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उभे होत आहेत. पोलिसांनी सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला अटक केली असून आरोपीने सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली दिली आहे. सुधीर सुरी यांच्यावर झालेल्या गोळीबारीची घटना मंदिरासमोरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे.

सुधीर सुरी यांना तीन ते चार गोळ्या लागल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी देखील सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. यावेळी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पंजाब एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी २३ ऑक्टोबरला ४ जणांना अटक केले होते. पोलिसांनी सुधीर सुरी यांच्यावर गोळी झालेल्या आरोपी हा रिंडा आणि लिंडा टोळीसाठी काम करत होता, अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

 

 

Exit mobile version