HW News Marathi
Uncategorized

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मृत्यूनंतर क्लास वन अधिकाऱ्याच्या मुलांना मिळणार नोकरी!

मुंबई। कोविड काळात कर्तव्य बजावत असताना अनेक अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अ आणि ब गटातील अधिकाऱ्यांचा सेवेत असतांना मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास नोकरी देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंपा धोरण लागू करावे.

प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला

कोविड परिस्थितीत अनेक अधिकाऱ्यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला आहे.या निर्णयामुळे राज्यातील अधिकाऱ्यांच्या निधनामुळे ओढवणाऱ्या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर

गट अ किंवा गट ब मधील अधिकाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून ” महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम २०२१ तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाशिकमध्ये २०० नोटांची छपाई पूर्ण

News Desk

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबाबत शिवसेनेचं मोठं विधान, शिवसेना काँग्रेसच्या वाटेवर!

News Desk

आजपासून पुन्हा कोट्यधीश बनण्याची संधी!

News Desk