Site icon HW News Marathi

“विधान परिषदेत मविआची विकेट पडेल; भाजपची नाही”, चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई | ‘विधान परिषद निवडणुकीत महविकास आघाडीची विकेड पडेल भाजपची नाही,’ असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तर नाना पटोले यांनी बोगस स्क्रिप्ट तयार केली, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लगावला आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज (18 जून) पत्रकार परिषद राजकारणात निकालापर्यंत जिंकण्याचा सर्वच दावा करतात.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “नाना पटोले जी काँग्रेस एक जागा हरल्यानंतर त्याची जी कारणे सांगावी लागत आहेत.  त्या कारणाची स्क्रिप्ट आताच तयार करत आहेत, असे म्हणत त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पाटील पुढे म्हणाले, “अशा प्रकरणे त्यांनी जी एक बोगस स्क्रिप्ट तयार केलेली आहे. ती त्यांनी पत्रकारांसमोर द्यावी. राजकारणामध्ये जिंकेपर्यंत किंवा पडेपर्यंत प्रत्येकाने जिंकण्याचा दावा करायचा असतो. घोडा मैदान लांब नाहीये. 20 तारखेला सकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. सायंकाळी 7 ते 7.30 वाजपेर्यंत निकाल स्पष्ट होईल. विकेट महाविकासआघाडीमधील एकाची पडेल. भाजपचे पाचही जण विजय होतील. आता महाविकासआघाडीतील कोणाची ते त्यांच्या आप आपसातील कळेल.”

राज्यसभेला सुद्धा भाजपला 11 मते हवी होती. ती कशी मिळणार अशी मते उपस्थित होत होती. ती मते भाजपला मिळाली आणि भाजपचा विजय झाला. आता अंक गणिताने ऐवढी फिगर म्हणतात. त्यापेक्षा जास्त मते भाजपला मिळतील. त्यांच्यातील बेबनावावर मी काही बोलणे बरोबर नाही. त्यांच्यातील बेबनाव हा थांबवण्याची त्यांच्यात ताकत नाही. तो बेबनाव राज्यसभेच्या निवडणुकीला  थांबवण्याची जी काही ताकत आहे. ती ताकद उपयोगात आली नाही. विधान परिषदेमध्ये देखील त्यांच्यातील बेबनाव थांबवण्याची जी ताकत आहे. ती निष्फळ होईल. महाविकासआघाडीच्या बेबनावचा फायदा भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील.

अग्निपथ योजनेविरोधातला हिंसाचार सैन्यात प्रवेश करण्याची इच्छा असलेला कुठलाही तरुण करणार नाही

केंद्र सरकारने आठवड्याभरापूर्वी 10 लाख बेरोजगाऱ्यांना नोकऱ्या देणार अशा घोषणे काँग्रेसची झोपच उडाली आहे. त्यामुळे अग्निपथमध्ये जी सैन्यातील मुळ भरती आहे ती बंद होणार नाही. ही अॅडीशनल योजना आहे. यातून हजारो रोजगार निर्माण होणार आहे. अशा परिस्थिती अग्निपथला विरोध करणे हे तरुणांनी समजून घेण्याची गरज आहे. यात आपला फायदा की या योजनेत तोटा आहे. यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे या आंदोलनामध्ये  ज्या प्रकारचा हिंसाचार चाला आहे. तो काही सैन्यामध्ये जाणाऱ्या युवकांच्या मन स्थितीचे लक्षण नाही. सैन्यामध्ये जाणार युवक देशासाठी जातो. देशाला मोठे करण्यासाठी जातो. देशाला मोठे करण्यासाठी जातो. तो देशाची सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कसा करेल. त्यामुळे हे आंदोनल निर्माण केलेल आहे. तरुणांना भडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे ज्या तरुणांला सैन्यात जायाचे आहे त्यांना माहिती आहे की सैन्यातील मुळ भरती चालूच आहे. देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा जो संकल्प आहे. आणि त्याचे वेळापत्रक सुरु झाले आहे यामुळे आता 18 ते 20 वयोगटातील तरुण देखील त्यांच्याकडे जाणार की काय या दृष्टीने या भितीने काँग्रेस ग्रासले आहे.

विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

“अजूनही त्यांचे प्रयत्न सुरू आहे. त्याचे रिपोर्टिंड आम्हाला येत आहे. ते कोणाशी बोलतात. काय चालल्याचे आहे. ज्यांच्याशी बोलतात आहे. ते आम्हाला सांगत आहे. त्यामुळे ते काय बोलतात. विरोधकांची वाक्य रचना काय आहे. केंद्राच्या सत्तेची जी गरमी आहे. याचा फायदा कसा घेतात. तपास यंत्रणांचा कसा दुरुपयोग चालू आहे. केंद्रीय तपास यंत्रणा कसे आमदारांना फोन लावतात. त्या सगळ्या गोष्टींची आम्हाला माहिती आहे. वेळ आली तर सगळ्या गोष्टींचा सामना करू. पण या पद्धतीचे लोकतंत्र होऊ शकत नाही. आता मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे काम ज्या पद्धतीने चालल्याले आहे. खऱ्या अर्थाने मी मगाशी सांगितले की, आता सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीश आपल्याला न्याया मागण्यासाठी जेव्हा पत्रकार परिषद घेतात. आम्हाला संरक्षण पाहिजे, याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेला चाललेला आहे. याचा अंदाज सगळ्यांना येईला पाहिजे. आणि या सगळ्या व्यवस्थेला भाजपच्या वतीने किती अडथळा निर्माण केला तरी महाविकास आघाडीचे सहा उमेवदार जिंकतील, ” असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केलेला आहे.

संबंधित बातम्या

“विधान परिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

 

Exit mobile version