Site icon HW News Marathi

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दाखल

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे बाप्पाच्या दर्शनासाठी घेण्यासाठी दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री आज (1 सप्टेंबर) दुपारी 4.30 वाजता राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरेंच्या निवासस्थानी काल (31 ऑगस्ट)  भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी बाप्पाचे दर्शन घेतले होते. मुख्यमंत्री हे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाणारे शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत. याआधी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि भाजपेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतली. राज्यात शिंदे सरकारने स्थापन झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी केली होते. त्यावेळी राज ठाकरेंची पत्नी शर्मिला ठाकरेंनी फडणवीसांचे औक्षण केले होते.

मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या भेटीदरम्यान आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काही नवीन समीकरणे होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका स्वाकारल्यानंतर भाजपशी त्यांची जवळीक वाढली आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली होती.

 

 

 

 

Exit mobile version