HW News Marathi
Uncategorized

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची इतिहासात पहिल्यांदाचं बारामतीत सभा…

पुणे | आपल्या संपुर्ण राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारामतीमध्ये निवडणुकीच्या काळात सभा घेणे नेहमी टाळले आहे, असा इतिहास सांगतो. त्यामुळे आज निवडणुकीसाठी नाही तर शरद पवारांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार यांचे सुपुत्र राजेंद्र पवार यांच्या कृषिक प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री बारामतीत येणार आहेत . कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर उद्धव ठाकरे यांची इतिहासात पहिल्यांदाचं बारामतीत सभा होत आहे. बॉलीवूड अभिनेता अमीर खान याची या कार्यक्रमास खास उपस्थिती असणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

बारामतीतील शारदानगर येथील 110 एकर मधील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक शेती प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार खासदार सुप्रीया सुळे व सिने अभिनेता अमीर खान हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील शेतकरी बांधवांना शेतीक्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान व प्रात्यक्षिकयुक्त ‘कृषिक’ हे कृषि व पशुपक्षी प्रदर्शन आजपासून म्हणजेच १६ जानेवारी ते १९ जानेवारी पर्यन्त माळेगाव खुर्द (बारामती) येथे आयोजित करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल गांधी देशाचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम: शिवसेना

News Desk

नवकलावंतांसाठी जहांगिरमध्ये प्रदर्शनाची संधी

News Desk

Budget 2019 : सोने-चांदीची खरेदी महागली

News Desk