HW News Marathi
Uncategorized

हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, सर्व ठिकाणी आमची तयारी आहे

नवी दिल्ली | आज (५ जुलै) राजनाथ सिंह यांनी दिल्ली येथे कोविड सेंटरला भेट दिली. त्यांच्यासमवेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील होते. यावेळी राजनाथ सिंह यांनी कोरोना आणि सीमावाद यासंबधी प्रश्नावर पत्राकारांशी संवाद साधला.

चीनसोबतच्या सीमा वादावर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. भारत प्रत्येक आघाडीवर सज्ज आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. ते म्हणाले, “सर्व ठिकाणी आमची तयारी आहे. हॉस्पिटल असो किंवा बॉर्डर, आम्ही कधीही तयारीत मागे नसतो.”

 

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बलात्कारी आसाराम बाबाला जामीन नाहीच

swarit

विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे !

News Desk

“करोनामध्येही सरकारला सावकारासारखी वसुली करायचीय, म्हणून हे सगळं नाटक सुरू”

News Desk