Site icon HW News Marathi

“एखाद्यावर विश्वास टाकला म्हणजे आम्ही अंधविश्वास टाकतो,” उद्धव ठाकरेंना पश्चाताप

मुंबई | “एखाद्यावर विश्वास टाकला म्हणजे आम्ही अंधविश्वास टाकतो. आणि त्या व्यक्तीस पूर्ण जबाबदार मग त्याला ताकद आणि शक्ती देणे असेल,” असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखविलेल्याचा पश्चाताप झाल्याचे त्यांनी सांगितले. उद्धव ठाकरेंनी ही मुलाखत दैनिक ‘सामना’चे (saamana )कार्यकारी संपादक संजय राऊत (sanjay raut) यांनी घेतली आहे. या मुलाखतीचा पहिला भाग आज (26 जुलै) सकाळी 8.30 वाजता प्रसारित करण्यात आला आहे. या मुलाखतीत राऊतांनी  उद्धव ठाकरेंच्या मानेवर झालेल्या शस्त्रक्रियेच्या काळात शिंदे गट तयार करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आम्ही शेवटी पक्ष हा व्यावसायिक दृष्ट्या नाही चालवत असे मी म्हणेन. कारण तुम्ही सुद्धा गेल्या अनेक वर्ष शिवसेना अनुभवताय आणि शिवसैनिकच आहात तुम्ही. आपण शिवसेनेला एक परिवार म्हणून बघत आलोय. बाळासाहेब आणि माँने देखील हेच शिकविले, एकदा आपले म्हटले की आपले. कदाचित राजकारणात असे वागणे गुन्हा किंवा चुक असेल, ती आमच्याकडून वारंवार होते. एखाद्यावर विश्वास टाकला म्हणजे आम्ही अंधविश्वास टाकतो. पूर्ण जबाबदार मग त्याला ताकद देणे, शक्ती देणे असेल, म्हणजे 2014 साली जे आता आम्ही हिंदुत्व सोडले म्हणून ओरडत आहेत. बोंब मारत आहेत, त्यांना मला हाच प्रश्न विचारायचा आहे. 2014 साली भाजपने युती तोडली होती. तेव्हा आपण काय सोडले होते. काहीच नाही, आजही हिंदुत्व सोडले नाही. पण,  मधल्या काळात शिवसेना विरोधी पक्षाच्या बाकावर आली  होती, तेव्हा अनेकांना वाटले होते की, शिवसेना संपेल. पण, शिवसेना एकाकी लढलीली आणि 63 आमदार निवडून आले. त्या काळात विरोधी पक्षाची जी जबाबदारी आपल्यावर आली. तेव्हा विरोधी पद कोणाला दिले होते, “असा सवाल शिंदेना केला.

राज्यात आता शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले आहे. यावरून उद्धव ठाकरेंनी शिवसेना आणि भाजप यांच्या २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ठरलेल्या अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदावरून भाजपवर निशाण साध उद्धव ठाकरे म्हणाले, “आता सुद्धा भाजपने आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. हे २०१९च्या वेळी निवडणुकीत माझ्याशी बोलणी केल्याप्रमाणे हे आता अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री केले आहे. हे भाजपने बोलणी केल्याप्रमाणे तेव्हाच केले असते. तर ते सन्माने झाले असते. नाकी, देशभरामध्ये पर्यटन करण्याची गरज भासली नसती, असे भाजपने केले असे तर आमदार फोडण्यासाठी जे हजारो कोटी रुपये खर्च केले गेले. विमानांचा खर्च, हॉटेलचा खर्च यानंतर काही अतिरिक्त खर्च म्हणजे खोक्यातला खर्च. त्या खोक्यात काय दडलेय, हे ज्याचे त्याला माहिती, हे घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला कळाले असेल, पण हे फुकटात झाले असते ना, आणि सन्मानाने झाले असते. हेच तर मी सांगत होतो,” असे सूचक विधान उद्धव ठाकरेंनी राऊतांना दिलेल्या मुलाखतीत केले.

भाजपला शिवसेना संपवायची

राऊतमध्येच बोलले ना म्हणाले की का घडविले गेले, यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपला शिवसेना संपवायची आहे. जे शिवसेनेबरोबर घडविले होते, अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्री पद हेच तर तुम्ही आता केले. ते जर आधीच केले असते तर निदान पाच वर्षामध्ये भाजपला एकदा तरी मुख्यमंत्री पद मिळाले असते. ही जी काय सोंग डोंगे करत आहेत. आम्ही शिवसेना, आता ते म्हणत आहेत, ती शिवसेना नाहीये. हे सगळे तोडफोड करून त्यांचे समाधान होत नाही. त्यांना शिवसेना संपवायची आहे. राज्यात सत्ता आल्यानंतर ते शिवसेना संपवायला बघत आहेत.”

संबंधित बातम्या

“सडलेली पाने असतात, ती झडलीच पाहिजे,” उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

“देव पाण्यात बुडवित बसलेली लोकं आता पक्ष बुडवायला निघाले,” उद्धव ठाकरेंचा आरोप

 

Exit mobile version