HW News Marathi
Uncategorized

भारताची पदकांची लयलूट, प्रमोद भगतला सुवर्ण!

टोक्यो | टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. पुरुषांच्या SL3 प्रकारात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलला पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. तर याच प्रकारात मनोज सरकारने जपानच्या डेसुके फुजीहाराला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. पुरुष एकेरीच्या SL4 प्रकारात, सुहास यथिराजने सुवर्णपदकाच्या लढतीत आपले स्थान निश्चित केले आहे.

प्रमोदपूर्वी भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज अधाना यांनी P4 मिश्रित ५० मीटर पिस्तूल SH1 नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले. १९ वर्षीय नरवालने २१८.२ गुण मिळवत पॅरालिम्पिकमध्ये विक्रम केला आहे. दुसरीकडे, मंगळवारी कांस्य जिंकणाऱ्या सिंहराजने आज २१६.७ गुणांसह रौप्यपदक जिंकले. रशियन ऑलिम्पिक समितीचे सेर्गेई मालिशेव यांनी १९६.८ गुणांसह कांस्यपदक जिंकले. यापूर्वी पात्रता फेरीत सिंहराज अधाना ५३६ गुणांसह चौथ्या आणि नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता.

सुवर्ण दिवस…

भारतासाठी शनिवार हा अतिशय खास दिवस आहे. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी पी४ मिश्रित ५० मीटर पिस्तूल एसएच१ नेमबाजीमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवले आहे. पात्रता फेरीत, सिंहराज ५३६ गुणांसह चौथ्या, तर मनीष नरवाल ५३३ गुणांसह सातव्या स्थानावर होता. यासह, भारताच्या पदकांची संख्या १५ झाली आहे. ज्यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या पॅरालिम्पिकमध्ये ३९ वर्षीय सिंहराजला दुसरे पदक मिळाले. यापूर्वी त्याने १० मीटर एअर पिस्तूल एसएच१ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाण्यातील रिक्षाचालकांनी ‘मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री’ म्हणत दिला एकनाथ शिंदेंना पाठिंबा

Manasi Devkar

माझा मुलगा निर्दोष आहे, प्रद्युम्न हत्या प्रकरणात माझ्या मुलाला अडकवलं जातंय

News Desk

वाडिया रुग्णालयाला ४६ कोटी देणार, अजित पवारांचे आश्वासन

News Desk