HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरपला!

मुंबई | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन (pradeep patwardhan) यांचे निधन झाले आहे. प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 65 व्या वर्षी निधन झाले. प्रदीप पटवर्धन यांनी गिरगाव येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. प्रदीप पटवर्धन हा रंगभूमीवरचा हसरा चेहरा हरला होता. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्यांने मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी अनेक नाटके आणि सिनेमांमध्ये अभिनय केला असून प्रदीप पटवर्धन यांनी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मना आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. प्रदीप पटवर्धन यांनी कॉलेजमध्ये असताना अनेक स्पर्धा गाजवल्या. प्रदीप पटवर्धन यांची ‘मोरूची मावशी’ या नाटकातील भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. प्रदीप पटवर्धन यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्रदीप पटवर्धन यांनी मराठी सिनेसृष्टीतील एक फुल चार हाफ (1991), डान्स पार्टी (1995), मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009), गोला बेरीज (2012) आणि बॉम्बे वेल्वेट (2015), पोलिस लाईन (2016), नवरा माझा नवसाचा आणि 1234 (2016), व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठला या सिनेमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चीनमध्येही आता मराठी चित्रपटाचा डंका

News Desk

जाणून घ्या… बालदिन १४ नोव्हेंबरलाच का साजरा केला जातो

News Desk

FLASHBACK 2018 : मॅगसेसे पुरस्कारासाठी दोन भारतीयांची निवड

News Desk