Site icon HW News Marathi

“मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही”, महेश शिंदेंची धक्काबुक्कीनंतरची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | राज्यात सध्या शिंदे सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन सुरू आहे. पावसाळी अधिवेशनाचा आज (24 ऑगस्ट) दिवस आहे. अधिवेशनादरम्यान विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari) या दोघांमध्ये बाचाबाची झाली. यानंतर दोघेही एकमेकांवर धावून गेले आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती माध्यमातून मिळाली. “मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही. अशा विचारांच्या लोकांवर त्यांच्या वरिष्ठांनी कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी मीडियाच्या माध्यमातून केली.

अमोल मिटकरींनी आपल्याला ढकलले, असा आपला दावा आहे, यासंदर्भात तुम्ही विधानसभा अध्यक्षकांकडे जाणार का?, असा प्रश्न पत्रकारांनी शिंदेंना म्हणाले, “अमोल मिटकरींबद्दल सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात विचारांचा काळा डाग हे आमोल मिटकरी यांचे वागणूक संपूर्ण विधीमंडळाने पाहिले आहे. सगळे पत्रकारांनी पाहिले आहे. तुम्ही सीसीटीव्ही फुजे पाहू शकता. आम्ही शांतपणे त्या ठिकाणी आले होतो, असे असताना आम्हाला धक्काबुक्की केली. मिटकरींनी त्या ठिकाणी  ढकलेले गेले, आणि मग पुढच्या गोष्टी सुरु झाल्या. मिटकरी हे लोकशाहीवादी विचाराचा नेता नाही. त्यांचे विचार हे जहाल विचार आहेत. आणि हे चुकीचे विचार आहेत. माझी त्यांच्या वरिष्ठांना विनंती आहे. अशा विचारांच्या माणसांपासून लोकशाहीला धोका होतो, अशा विचारांच्या लोकांवर आपण कारवाई केली पाहिजे. एखादे प्रकरण दुसऱ्या दिशेला कसे न्यायाचे आपली चूक झाली. त्या प्रकरणाला कसे वळण त्यांचे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे.”

 

महेश शिंदे म्हणाले, “आमचे विरोधक या ठिकाणी घोषणा देत. आम्हाला चिथावत होते. विरोधक सातत्याने घोषणा देत होते. आज आम्ही सगळ्या आमदारांनी एकत्र येवून आमची भूमिका मांडण्यासाठी शांतपणे आम्ही आंदोलन करत होते. आम्ही आमच्या घोषणा देत होतो. आमचे आंदोलन चालू असताना आचानक पाठी बागून काही विधीमंडळ सदस्य आणि विधानपरिषद सदस्य पुढे आले. आणि आमच्या आंदोलनाला गाल बोट लावण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी गाजर आणले, अर्वाच्च भाषा वापरली गेली. त्या ठिकाणी धक्काबुक्की केली.  खरे तर हे विधी मंडळ परिसरातील गैरवर्तन हे अशोभनिय आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने घोषणा देत होतो. मागच्या अडीज वर्षामध्ये जो गैर कारभार आमच्या विरोधकांनी केला. त्या गैर कारभाराचा पर्दाफाश आम्ही मीडियासमोर करत होतो. हे त्यांना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनी आमचे लोकशाहीत चाललेल दाबण्याचा या ठिकाणी केला.”

 

 

 

 

Exit mobile version