Site icon HW News Marathi

“मुख्यमंत्र्यांविरोधात बोलाल तर …”, संजय गायकवाडांचा धमकीवजा इशारा

मुंबई । “एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल तर चुन चुनके अन् गिन गिनके मारेंगे” अशी धमकी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी शिवसेनेला दिली आहे. गायकवाडांनी बुलढाण्यात शिवसेनेच्या सत्कार समारंभात काल (३ सप्टेंबर) शिवसेनेला धमकी दिली आहे. या समारंभात शिंदे गट आणि बुलढाण्यातील स्थानिक शिवसैनिकांमध्ये राडा झाल्यानंतर राजकीय वातावरण तापल्यानंतर गायकवाडांनी धमकी दिली.

संजय गायकवाड म्हणाले, “ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि नेते पातळी सोडून बोलत असून ठाकरे गटाच्या लोकांना माहिती नाही की शिंदे गटाचे आणि गायकवाडांचे कार्यकर्ते किती भयानक आहेत. ते सर्वजण आम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देत आहेत. परंतु, शिंदेंच्या विरोधात बोलाल तर आम्ही सर्वांना चुन चुनके आणि गिन गिनके मारेंगे,” असा धमकी दिली आहे. गायकवाड पुढे म्हणाले, ज्या लोकांना भाषा करत नाही, त्यांच्यासाठी हीच भाषा वापरणार असून एकनाथ शिंदेची शिवसेना ही खरी शिवसेना आहे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.

“बुलढाण्यात काल स्थानिक शिवसैनिक आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यात पोलिसांनी मध्यस्थी केली नसती तर तेव्हा त्यांचा हिशोब चुकता केला असता, ” असे त्यावेळी म्हणाले. या सभारंभात शिवसैनिक आणि गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये १५ मिनिटे राडा सुरू होता. यात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेक करत मारहाण केल्याचा आरोप दोन्ही गटाकडून केला जात आहे.

 

 

Exit mobile version