HW News Marathi
Uncategorized

UNSC ची अध्यक्षता करणारे मोदी ठरले पहिले भारतीय पंतप्रधान


नवी दिल्ली | UNSCची अध्यक्षता भारताला आज (१ ऑगस्ट) मिळाली आहे. याआधी अध्यक्ष फ्रांस होता. गेल्या ७५ वर्षात असे पहिल्यांदा होत आहे की, भारताचे पंतप्रधान युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलची अध्यक्षता करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहेत. ते असे करणारे एकमेव आणि पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान पीवी नरसिंहराव यांनी भारताचे प्रतिनिधी म्हणून पीवी नरसिंहराव UNSCच्या बैठकीत भाग घेतला होता. भारताचे माजी राजदूत सैय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले की, युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलची अध्यक्षता करणे म्हणजेच भारतीय राजकीय नेतृत्वाचा गौरव आहे. भारत या कॉउंसिलच्या बैठकीत समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा, शांतता, तसेच कॉउंटर टेररिझमच्या मुद्द्यांना प्रामुख्याने मांडणार आहे.

भारत वर्ष २०२१ आणि २०२२ साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थाई सदस्य आहे. सोमवारी भारताचे राजदूत टीएस तिरूमुर्ती संयुक्त राष्ट्रांच्या हेडक्वार्टरमध्ये एक पत्रकार परिषद घेणार आहेत. संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे राजदूत टीएस तिरूमुर्ती यांनी फ्रांसला धन्यवाद दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला समर्थन दिल्याने त्यांनी फ्रांसचे आभार मानले आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी युनायटेड नेशन सेक्युरिटी कॉउंसिलच्या बैठकीची अध्यक्षता करणार आहेत. ते असे करणारे एकमेव आणि पहिले भारतीय पंतप्रधान असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना मातृशोक

News Desk

अमरनाथ यात्रेत अडकले महाराष्ट्रातील भाविक

News Desk

“गेली अडीच वर्षे आम्हाला राज्यमंत्री म्हणून काहीच अधिकार नव्हते”; Shambhuraj Desai

Adil