HW News Marathi
Uncategorized

राज्यात १० हजारहून अधिक मतदारांनी दिली ‘नोटा’ला पसंती

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या निकालात देशाच्या जनते एनडीएला कौल देऊन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविला आहे. तर राज्यातही शिवसेना-भाजप यांच्या युतीला मोठे यश मिळाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपचे ४१ खासदार होते तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी हातकणंगलेमधून निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपने आपल्या जागा राखल्या आहेत. भाजपला बहुमत मिळाले असले तरी नोटाचे प्रमाणही वाढलेले पाहायला मिळत आहे. निवडणुकीत नोटांना १० हजारांहून अधिक मतदान झाले आहे.

मतांचे गणित पाहिले तर राज्यात भाजपला २७. ६ टक्के( १ कोटी ४९ लाखांहून अधिक) मते मिळाली. शिवसेनेला २३.३ टक्के( १ कोटी २५ लाख ८९ हजारांहून अधिक) मते मिळाली. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसला १६.३ टक्के(८७ लाख ९२ हजारांहून अधिक) तर राष्ट्रवादीला १५.५ टक्के(८३ लाख ८७ हजारांहून अधिक) मते मिळाली. इतरांना १४.६ टक्के(७८ लाख ६५ हजारांहून अधिक) आणि नोटाला( ४ लाख ८८ हजारांहून अधिक) मतदान झाले आहे. त्यामुळे नेमके राज्यातील नोटांच्या मतदानात झालेली वाढ का झाली असावी अशा चर्चा आता सुरु आहेत.

राज्यातील मतदारसंघात नोटांसाठी झाले ऐवढे मतदान

  • दक्षिण मुंबई – १५ हजारांहून अधिक
  • उत्तर मुंबई – ११ हजारांहून अधिक
  • उत्तर मध्य मुंबई – १० हजारांहून अधिक
  • ईशान्य मुंबई – १२ हजारांहून अधिक
  • उत्तर पश्चिम – १७ हजारांहून अधिक
  • दक्षिण मध्य मुंबई – १३ हजारांहून अधिक
  • पुणे – १० हजारांहून अधिक
  • रायगड – ११ हजारांहून अधिक
  • ठाणे – २० हजारांहून अधिक
  • मावळ – १५ हजारांहून अधिक
  • भिवंडी – १६ हजारांहून अधिक
  • कल्याण – १२ हजारांहून अधिक
  • रत्नागिरी-सिंधुदुर्ग – १३ हजारांहून अधिक

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करताय शिवसेना खासदार संजय राऊतांच वक्तव्य

News Desk

 मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही !

News Desk

ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत, मग काय प्रॉब्लेम?

News Desk