Site icon HW News Marathi

तरुणीच्या अपहरणावरून नवनीत राणांचे पोलिसांसोबत खडाजंगी

मुंबई | अमरावतीत एका 19 वर्षीय हिंदू तरुणीचे अपहरण करून बळजबरीने आंतरधर्मीय विवाह केला आहे, असा आरोप  खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये राणांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणात अपहरण केलेल्या मुलीने केलेल्या चॅटिंगवरून पोलिसांनी सोहेल शहा एका संशयित आरोपीला पकडले आहे. परंतु, पोलिसांना अपहरण केलेल्या 19 वर्षीय हिंदू तरुणी सापडली नाही. यामुळे राणांनी पोलिसांविरोधात  आक्रमक पवित्रा घेत आहे. यावेळी पोलीस आणि राणांमध्ये खडाजंगी पाहायाल मिळाले.

 

या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी व माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या राणांनी राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांना कॉल केला असता तो कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला. यावरून राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे व पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यावर नवनीत राणा चांगल्याच खडाजंगी झाली. “मी मागासवर्गीय असल्याने माझा कॉल रेकॉर्ड केला,” असा आरोप राणां केला असून पोलीस ठाण्यातील मनीष ठाकरे यांचा फोन हिसकावून घेतला.

 

दरम्यान, गेल्या दहा दिवसातील पाचवी घटना आणि पोलीस कारवाई करत नसल्याचा राणांनी यावेळी केला आहे. दरम्यान, राणांनी अपहरण केलेल्या मुलींच्या आईसुद्धा आपल्यासोबत घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या होत्या. राणांनी दोन तासात अपहरण केलेल्या मुलीला आणण्याचे अल्टीमेटम राणांनी विक्रमा साळींना दिले आहे.

 

 

Exit mobile version