HW News Marathi
Uncategorized

खेड पंचायत समिती सभापतीपद राष्ट्रवादीकडे, बहुमत असूनही शिवसेनेला धक्का!

मुंबई। गेल्या तीन महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या सभापतीपदावरुन शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने असून त्याच्यात संघर्ष सुरू होता. मात्र मंगळवारी शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी सभापतीपदाची निवडणूक पार पडली. यावेळी शिवसेनेकडे बहुमत असताना देखील सभापतीपद हा राष्ट्रवादीचा झाल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी ओढावली आहे. सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरुण चौधरी यांची निवड झाल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली असून बहुमतातील शिवसैनिकांची आगपाखड पाहायला मिळत आहे. खेड पंचायत समितीवर शिवसेनेची एकहाती सत्ता असताना शिवसेनेतील सदस्यामध्ये मतभेद झाल्याने सभापतीपदावरुन शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा संघर्ष सुरू होता. याचदरम्यान काही वादविवाद झाल्याने शिवसेनेचे काही सदस्य राष्ट्रवादीशी जोडले गेले आणि पक्षनेतृत्वाकडे तक्रारी झाल्या.

शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संतप्तेची भावना

राष्ट्रवादीकडे सभापतीपद गेल्याने बहुमत असून शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यामुळे शिवसैनिक संतापले असून शिवसेनेच्या नेत्यांमध्ये संतप्तेची भावना बघायला मिळाली. साहेब शिवसैनिकांच्या अन्यायाला वाचा फोडा अन्यथा शिवसेना हे नावच संपून जाईल व शिवसेनेवरचा लोकांचा विश्वास उडेल, अशी भावना शिवसेनेच्या माजी उपसभापती ज्योती अरगडे यांनी व्यक्त करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनवणी केली आहे.

काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड

सभापतीपदासाठी खेड पंचायत समितीच्या बैठकीत शिवसेनेच्या वतीने भगवान पोखरकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांना पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे यांनी अनुमोदक म्हणून त्यांच्या उमेदवारी अर्जावर सही केली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गटनेते अरुण चौधरी यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारी अर्जावर पंचायत समिती सदस्य वैशाली गव्हाणे यांनी सही केली आहे. या दरम्यान नामनिर्देशिन पत्राच्या छाणनीत शिवसेनेचे उमेदवार भगवान पोखरकर यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्राची पडताळणी नसल्याचे कारण देत हा अर्ज बाद करण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याचे समोर आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५ हजार गरीबांना अन्न धान्य वितरित करुन घडवला आदर्श…

swarit

केळीच्या घटातून पाठवल्या जातात बनावट नोटा

News Desk

कॉंग्रेसच्या तब्बल १२० नेत्यांचे राजीनामे…

News Desk