Site icon HW News Marathi

“धनुष्याबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,” उद्धव ठाकरेंचा विश्वास

मुंबई | “धनुष्याबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही,” असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेला आहे. राज्यात एकनाथ शिंदेंनी पक्षासोबत बंड करत भाजपसोब हात मिळवणी करत सत्ता स्थापन केली. परंतु, शिंनी आपणच खऱी शिवसेना असल्याचा वारंवार दावा केला आहे. यामुळे शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हावर देखील शिंदे गटानी दावा केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठकारेंनी आज (८ जुलै) पत्रकार परिषदे घेत शिवसेनेच्या धनुष्य बाण या चिन्हाबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “एक चर्चा चालेली आहे ती म्हणजे शिवसेनेच्या चिन्हाबद्दल मला तुम्हाला मुदामुन येथे बोलविले. धनुष्यबाण मी माझ्या शिवसैनिकांना बोलताना एवढे सांगितले की,कायद्याच्या  दृष्टीने पाहिले आणि घटनेमध्ये काय नमुद केलेले आहे. त्यानुसार, धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे ती चिंता सोडा. पण चिन्ह म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर हेच येते, मतदान पत्रिकेवरचे चिन्हे हे महत्वाचे असते. ते आपले धनुष्यबाण आहे.ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. नुकसेच धनुष्यबाणवर लोक नाही विचार करत. पण धनुष्य बाण हाती घेतलेल्या माणसाची देखील चिन्हे बघतात. याची लक्षणे बरोबर नाहीत. आणि हा शिवसेनेचा उमेदवार आहे याला सुद्धा लोक विचार करून मतदान करत असतात. यानंतर एकूण मागच्या काळात काय काय झाले होते. याचा अर्थ असा नाही होत, नवीन चिन्हाचा विचार करा वगैरे, अचिबात नाही,  कारण ते करण्याची गरज नाही. मी तुम्हाला बोलवून ठामपणे सांगतोय. शिवसेनेपासून धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हे घटनात्मक आणि कायदेशी जे अभ्यासक आहेत यांच्याशी बोलून मी आपल्याला सांगत आहे. हे मी मला बरे वाटावे म्हणून उगाच बोलत नाही.”

उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत काय म्हणाले

“कायद्याने जी लढाई देणार आहोत, परंतु, दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तर लढा कोणीही गाफील राहू नका, गाफील न राहता नव्या चिन्हाची तयारी ठेवा,” असे आवाहन उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना केले होते. शिंदेंसह ४० आमदारांनी पक्षासोबत बंड पुकारले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले. यावेळी शिंदे हे आपण शवसैनिक असल्याचा दावा करत आहे. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version