HW News Marathi
Uncategorized

प्रभाकर सईलचा खुलासा “मला NCB ने चौकशीसाठी बोलावले नाही”

समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्यावर लाचखोरीचा आरोप करणाऱ्या प्रभाकर सइलने एनसीबीने चौकशी केली नसल्याचे म्हटले आहे. प्रभाकरचे वकील तुषार एन खंदारे यांनी सोमवारी एनसीबीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की, प्रभाकरला चौकशीसाठी बोलावले तर के कधीही एनसीबी ऑफिसमध्ये जातील.

मला मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून कळाले आहे की, NCB ने समन्स पाठवून मला चौकशीसाठी बोलावले

प्रभाकरने दावा केला होता की NCB ने त्याच्याकडून पंचनामा पेपर असल्याचे सांगून कोऱ्या कागदावर जबरदस्ती स्वाक्षरी घेतली. त्याला आर्यन किंवा कोणाच्याही अटकेविषयी माहिती नव्हती. प्रभाकरने आपल्या वकीलांच्या माध्यमातून पाठवलेल्या चिट्ठीमध्ये म्हटले आहे की, एनसीबीच्या विजलेंस विंगने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेला नाही. त्यांनी लिहिले, ‘मला मीडिया रिपोर्ट्सच्या माध्यमातून कळाले आहे की, NCB ने समन्स पाठवून मला चौकशीसाठी बोलावले आहे. मला स्पष्ट करायचे आहे की, मला कोणताही समन्स पाठवण्यात आलेला नाही आणि NCB च्या टीमने माझ्याशी संपर्क देखील केलेला नाही. मला बोलावल्यावर मी तिथे जाईल आणि जबाब दाखल करण्यासह सर्व पुरावे देखील देईल.’

प्रभाकरच्या आरोपानंतर एनसीबीच्या दक्षता शाखेने 4 सदस्यांची टीम तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. समीर वानखेडे यांनी तपास पथकासमोर हजर राहून स्पष्टीकरण दिले होते. तपासादरम्यान, दक्षता पथकाने मुंबई पोलिसांकडून मदतीचे आवाहन करत, मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून प्रभाकर सइलला एनसीबी दक्षता पथकासमोर हजर करण्याची विनंती केली. दोन दिवस बोलवूनही प्रभाकर हजर झाला नसल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्घाटनाला मुख्यमंत्रीच हवा असं काही नाही- राणे

News Desk

रवी राणांनी तलवार घेऊन यावे, मी हातात…! राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

News Desk

नाशिकमध्ये एसटी रिक्षा-बसचा भीषण अपघात, मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

News Desk