HW Marathi
Uncategorized देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

#PulwamaAttack : पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्षपूर्ण

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पुलवावा हल्ल्याला आज (१४ फेब्रुवारी) एक वर्षपूर्ण होत आहेत. हा हल्ला भारतावरील सर्वात मोठा हल्ला मानला जातो. संपूर्ण देशभरातून या भीषण दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली अर्पण करण्यात येत आली.  या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून प्रचंड संतापाची लाट उसळली होती. पुलवामामध्ये सीआरपीफच्या करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनी स्वीकारली आहे. अतिरेकी आदिल अहमद डाल याने हा हल्ला घडवून आणला असल्याची माहिती मिळत आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्याविरोधात मोठी लष्करी कारवाई केली. भारतीय हवाई दलाकडून २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशवादी संघटनेच्या तळ उद्ध्वस्त केले.  भारतीय हवाई दलाने ‘मिराज २०००’ या लढाऊ विमानांद्वारे पाकव्याप्त काश्मीर भागात १००० किलोचे बॉम्ब टाकले आहेत.  यात २५० पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा सरकारने केला होता. विशेष म्हणजे भारताने पाकिस्तानात घुसून केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वाढली

हल्ल्याचे निषेध करणारे सीआरपीएफचे तेव्हाचे ट्वीट

पुलवामा हल्ल्याचे सीआरपीएफने ट्वीट करत निषेध व्यक्त केला. त्यावेळी सीआरपीएफ ट्वीट करत म्हणाले, “आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही, जवानांचे बलिदान व्यर्थ होणार नाही. तर पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आमचे अभिवादन आणि आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. या घृणास्पद हल्ल्याचा बदला घेणारच.,” असे ट्वीटमध्ये लिहिले आहे. भीषण हल्ल्याची गंभीर दखल घेत मोदी सरकारने पाकिस्तानवर राजनैतिक पातळीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानला देण्यात आलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देखील काढून घेण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर मोदींनी केलेले ट्वीट

या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत पुलवामा हल्ल्याचे निषेध व्यक्त केला. मोदी ट्वीटमध्ये म्हणाले की, “दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर केलेला हा भ्याड हल्ला आहे. मी या हल्लाचा निषेध व्यक्त करत आहेत, जवानांचे हे बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही सर्व भारतीय एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शूर शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत उभे आहोत. जखमी झालेले जवान लवकर पूर्णपणे बरे होवोत,” असे म्हणाले होते.

पुलवामा हल्ल्याचे भारतातील अमेरिकेचे राजदूत किनेथ जस्टर यांनी ट्वीट करत हल्ल्याचा निषेध केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अमेरिका निषेध करत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत दु:ख व्यक्त करतो. शहीद आणि जखमी झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत अमेरिका असल्याचे जस्टर यांनी म्हटले. तसेच दहशतवादाचा सामना करण्यासाठी आणि मिटवण्यासाठी अमेरिका भारतासोबत असल्याचे किनेथ जस्टर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.

पुलवामा हल्ला कसा झाला

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्याला निशाणा बनवण्यात आले होते. लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. तब्बल २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर आदळली. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यात बसचा अक्षरश: चुराडा झाला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. पुलवामा हा हल्ला आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने घडवला.

 

जम्‍मू काश्मीरच्या पुलवामामध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर, देशभरात संतापाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे सीआरपीएफनेही आपल्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. आम्ही विसरणार नाही, आम्ही माफ करणार नाही, जवानांचं बलिदान व्यर्थ होणार नाही. तर हल्ला करणाऱ्यांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे, असं सीआरपीएफने म्हटलं आहे.

Related posts

Considering Man Dating Online Plans

राष्ट्रवादीचे महिला नेतृत्व आमच्याकडेच, आता त्यांच्याकडे काहीच उरले नाही !

News Desk

तुम्ही लोकसभेपूर्वी निर्णय घेतला असता तर सुप्रिया सुळेंनाही घरी पाठवले असते !

News Desk