Site icon HW News Marathi

छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशीला NIA कडून अटक

मुंबई | कुख्यात गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरेशीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केली आहे. कुरेशीला मुंबईतून अटक करण्यात आले आहे. दाऊद इब्राहिमच्या सहकाऱ्यांविरोधात कारवाई करत एनआयएने मे महिन्यात मुंबई आणि ठाणे येथील 20 ठिकाणी छापेमारी केली होती. तेव्हा देखील सलीम कुरेशीला ताब्यात घेतले होते. यावेळी कुरेशींची चौकशी केली होती.

दाऊद इब्राहिम याच्या नातेवाईकांशी आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने फेब्रुवारी महिन्यात अटक केली होती. या आर्थिक गैरव्यवहारदरम्यान मनी लाँड्रिंगच्या तपासादरम्यान ईडीने सलीम फ्रूटची चौकशी केली. यावेळी ईडीने दिलेल्या जबाबत सलीम फ्रूटने दाऊदची बहिण हसीना पारकरचा जवळचा सहकारी असल्याचे त्यांनी सांगितले. सलीम फ्रूटवाल्याने अनेक वादग्रस्त भूखंडाच्या व्यवहारात मध्यस्थी करून यातून पैसे उकळण्याचा बोलले जाते. मलिकांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहारात हसीना पारकरच्या चालकासोबत संगनमत करून कुर्ल्यातील भूखंड विकत घेतल्याचा आरोप आहे.

कोण आहे कुरेशी उर्फ सलीम फ्रूट

सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट गँगस्टर छोटा शकीलचा मेहुणा आहे. सलीम फ्रूट यांच्या कुटुंबाचा दक्षिण मुंबईत फळे विकण्याचा व्यवसाय आहे. यामुळे सलीम कुरेशीला सलीम फ्रूटच्या नावाने ओळखला जातो. छोटा शकील हा एक कुख्यात गँगस्टर असून लोकांना पैसे घेऊन मारण्याचे काम करत असतो. सलीम फ्रूट हा तीन-चार वेळा पाकिस्तानमध्ये छोटा शकीलच्या घरी गेला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

 

Exit mobile version