HW News Marathi
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी घेतली गजानन कीर्तिकर यांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी किर्तिकरांची भेट त्यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जावून घेतली आहे. कीर्तिकर हे काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे ते सध्या घरी आराम करत आहेत. “लवकरात लवकर पुर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय व्हावे याकरिता त्यांना यासमयी शुभेच्छा दिल्या,” असे मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करत माहिदी दिली आहे. या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.

उत्तर-पश्चिम मतदारसंघातून कीर्तिकर हे खासदार म्हणून निवडून आले आहे. कीर्तिकरांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमत्र्यांच्या भेटीसाठी गेले होते. गेल्याच आठवड्यात कीर्तिकर यांच्या पायामध्ये रक्ताची गाठ तयार झाल्यानंतर त्यांनी रहेजा रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कीर्तिकर शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी आले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी कीर्तिकरांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. यावेळी आमदार संजय शिरसाट, आमदार डॉ. बालाजी किणीकर तसेच गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर आणि त्यांचे कुटूंबीय उपस्थित होते.

तीन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या लोकसभेच्या 12 खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. या 12 खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत वेगळा गट स्थापन करण्यासाठी पत्र दिले आहेत. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत खासदार राहुल शेवाळेंचा गटनेता तर भावना गवळी शिवसेनेच्या मुख्य प्रतोद असा उल्लेख केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहा मातोश्रीवर दाखल

News Desk

कोणाची कॅालर तर कोणाच्या मिशा, हीच आहे का सातारच्या प्रचाराची दिशा ?

News Desk

“हिंदू जन आक्रोश मोर्चा मोदी आणि शाहांच्या भूमिकेविरूद्ध”, संजय राऊतांचा बोचरी टीका

Aprna