Site icon HW News Marathi

“भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर GST लावला,” सुप्रिया सुळेंचा टोला

मुंबई | “भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर केंद्र सरकारने सर्वांवर जीएसटी (GST) लावला,” राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महागाईवरून भाजप सरकारला टोला लगावला आहे. यावेळी ‘दत्त दत्त दत्ताची गाय, गायीच दूध, दुधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याच तूप’ ही कविता म्हणत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केंद्र सरकारवर महागाईवरून निशाणा साधला आहे. लोकसभेत आज (1 ऑगस्ट) महागाईवर चर्चा झाली. यावेळी सुप्रिया सुळेंनी दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण करत महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. “भाजपने काँग्रेस सरकारच्या 60 वर्षाच्या कामावर बोट दाखविले. परंतु, नवीन सून ही 8 वर्षात तयार होते,” असा टोलाही सुप्रिया सुळेंनी महागाईवर केलेल्या भाषणातून सरकारवर टीका केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सुषमा स्वराज येथे बसून आम्ही महागाईवर चर्चा करात होतो. सुषमा स्वराज आमच्या काळात महागाईवरून टीका करतायच्या आणि काही उपाय देखील सुचवित असायचे. आणि आम्ही सर्व जण त्यांचे भाषण ऐकायचे. सुषमा स्वराज यांनी दिलेल्या उपायाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करायचे. आज रशिकांत दुबे सांगत होते. त्यांनी 60 वर्षांचे इतिहाचे लेक्टर इतके मोठे होते. त्यांनी खूप चांगला इतिहास सांगितला. परंतु, त्या तेथे बसून 8 वर्ष झाले. मी मागच्यावेळीस सांगितले की, पण मी परत ऐकवायचे नव्हते. दुबेंचे 60 वर्षाचे लेक्चर ऐवढे मोठे चालले की, मला त्यांना फक्त लक्ष्यात आणून त्याचे आहे. 8 वर्ष खूप असतात, नवीन लग्न झालेली सून घरी येते ना. 8 वर्षानंतर लग्नात देखील कोणी ऐकत नाही. ही हे माझ्या सासूपासून सुरू आहे हे कोणी ऐकून घेत नाही. 8 वर्षात सूनही त्या घराची सदस्य होऊन जाते. हाच महागाईचा प्रॉब्लेम आहे. मला सुषमा स्वराज यांचे शब्द आठवत आहे. आजच्या भाषणवर सुषमा स्वराज यांचे शब्द पूर्णपणे लागू होत आहेत. सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्या खिश्यातून काय जाते आणि त्याबद्दल्यात त्यांना काय मिळणार आहे.

दत्त गुरु भगवान आणि गाय फक्त या दोघांना सोडले तर सर्वांवर जीएसटी लावले

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “आमच्या महाराष्ट्रात एक कविता लिहितात, आम्ही जेव्हा लहान होतो, तेव्हा आम्हाला शिकविले जायाचे की, ‘दत्त दत्त दत्ताची गाय, गायीच दूध, दुधाची साय, सायीचे दही, दह्याचे ताक, ताकाचे लोणी, लोण्याच तूप’ ही कविता ऐकून आम्ही मोठे झालेलो आहे. यात दत्त गुरु भगवान आणि गाय या दोघांना सोडले तर तुम्ही सर्वांवर जीएसटी लावले आहे. बरोबर आहे, देवावर अजूनपर्यंत जीएसटी लावलेला आहे. तुम्ही विचार करा, पनीर, दही, गुळ, साखर, खोबरेल, मुरमुरा, तांदूळाचे पीठ आदी गोष्टीवर त्यांनी जीएसटी लावला आहे.”

महागाईवरून चिमुकलीने पंतप्रधानांना लिहिले पत्र

“माझ्या सहकारी कनिणी मोजीणींनी एका लहान मुलांचा उल्लेख केला. किर्ती दुबे 6 वर्षाच्या मुलींचे नाव आज सर्व वृत्तपत्रात त्या मुलींने लिहिलेले पत्र छापले आहे. खूप चांगल्या अक्षरात त्या चिमुकलीने लिहिले की मी फक्त सरकारला विचारू इच्छिते, एक सहा वर्षाची चिमुकली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून महागाईवर बोलते. भाजप सरकारचा नारा आहे, ‘बेटी पढाओ आणि बेटी बढाओ’ या भारताची मुलगी एक पेन्सिलसाठी पत्र लिहिते,”

 

 

 

Exit mobile version