Site icon HW News Marathi

जाणून घ्या… एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी करण्यामागचे खरे कारण

मुंबई | शिवसेनेचे निष्ठवंत मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे गुजरात येथील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासह नाराज शिवसेनेचे 13 आमदार गुजरातमध्ये गेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, आज उघडपणे शिवसेने अंतर्गत नाराजी चवाट्यावर आली आहे. यामुळे शिवसेनेत सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेतील निष्ठावंत एकनाथ शिंदेंच्या नाराजी मागचे नेमके काय कारण आहे हे आपण पाहू या.

एकनाथ शिंदे यांच्या नाराजी मागे अनेक कारण आहेत. यावर प्रकाश टाकले तर आपल्याला लक्ष्यात येईल की, एकनाथ शिंदे यांची नाराजी ही फक्त राज्यसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका परेती नाही. याआधी अनेक वेळा एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. पण शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचे बोलले जात होते. परंतु, याच एकनाथ शिंदेंचा 2019 च्या महविकास आघाडीतील मुहूर्तमेढ रोविण्यात मोठा वाटा होता. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये एकनाथ शिंदेंचे नाव चर्चेत होते. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्री पद दिले होते.

राजकीय अनुभवाने कमी असलेल्या अनेक युवा नेत्यांचा हस्तक्षेप

दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत कोणतीही निवडणूक न लढलेल्या आणि एकनाथ शिंदेच्या तुलनेत राजकीय अनुभवाने कमी असलेल्या अनेक युवा नेता वरूण सरदेसाई, राहुल कंनाल, सूरज ठाकूर आणि अमोल किर्तीकर यांचा त्यांच्या कामात हस्तक्षेप करत होते, अशी माहिती एच. डब्ल्यू. मराठीच्या सूत्रांकडून मिळाली आहे. हे युवा नेते एकनाथ शिंदेंना त्यांच्या कामाबद्दल सुचना करणे आदी गोष्टी करत होत होते.

उद्धव ठाकरेंना नेत्यांचे ऐकण्यासाठी वेळ नाही

तसेच पक्षातील काही जुने जाणकार नेते देखील एकनाथ शिंदेंच्या कामात हस्तक्षेप करत होते. एकना शिंदेंना त्यांना दिलेल्या खात्यात ढवळाढवळ करत होते. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून याबद्दल बोलण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी मातोश्रीवर गेल्यावर ते कामात व्यस्त आहे. त्यांना भेटण्यास वेळ नाही, प्रकृती बरी नाही अशा अनेक कारणे दिली जात होती. यामुळे पक्षा अंतर्गत नेते आणि युवासोबत होणाऱ्या तक्रारी ऐकून घेणारे आणि त्यांच्यावर उपाय काढणारे कोणी नाही. याउलट उद्धव ठाकरेंच्या नावांनी अनेक गोष्टी हे त्यांचे निकटवर्ती करत होते. यामुळे एकनाथ शिंदेच्या मनात नेते आणि युवा नेतांबद्दल दरी निर्माण झाली. या सर्व गोष्टी एकनाथ शिंदेंना पक्षाविरोधात बंडखोरी करण्यामागचे महत्वाचे कारण मानले जाते.

 

संबंधित बातम्या
विधान परिषदेच्या निकालानंतर ‘मविआ’मध्ये मोठा स्फोट; शिवसेनेचे एकनाथ शिंदे नॉट रिचेबल 
एकनाथ शिंदेसह शिवसेनेचे नॉट रिचेबल आमदार गुजरातमधील मेरिडियन हॉटेलमध्ये मुक्कामी
एकनाथ शिंदे हे आमचे जिवाभावाचे सहकारी! – संजय राऊत
Exit mobile version