Site icon HW News Marathi

ऐतिहासिक स्मारकांच्या विकासासाठी नियोजन समितीच्या निधीतून तरतूद! – सुधीर मुनगंटीवार

मुंबई | राज्यातील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईलअसे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज (25 ऑगस्ट) विधानसभेत सांगितले. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.

 

मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले कीस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील विविध शहरांमधील ऐतिहासिक आणि वारसा स्मारकांचे जतन करण्यात येत आहे. राज्यातील सर्व स्मारकांचे जतन करण्यासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तीन टक्के रक्कम राखीव ठेवण्यासाठी विचार केला जाईल. ही रक्कम येत्या तीन वर्षांसाठीच राखीव ठेवण्याबाबत विचार केला जाईल.

 

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील चांदणी तलावरामेश्वर मंदिरसावकार वाडा आदी केंद्र आणि राज्य संरक्षित स्मारकांच्या विकास आणि जतन-दुरुस्ती कामांसाठी सर्वांगीण विकास आराखडा पूर्ण करुन घेण्याचे नियोजन आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येईल. तसेच केंद्र सरकारच्या विभागाशी पाठपुरावा केला जाईलअसेही मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Exit mobile version