Site icon HW News Marathi

“राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे”, अमित शहांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र

मुंबई । “राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे”, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray)  टीका केली. अमित शहांनी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आज (५ सप्टेंबर) मेघदूध बंगल्यावर भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतान उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी अमित शहांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप १५० जागा जिंकण्याचे आहे, अशी घोषणा त्यांनी केली. मुंबई दौऱ्यादरम्यान अमिश शहांनी लालबागचा राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले.

अमित शहा म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी आपल्याला कशाप्रकारे धोका दिला आहे. राजकारणात सगळे काही सहन करा. परंतु, धोका मात्र सहन करू नका. राजकाणात जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. आणि शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एक एक कार्यकर्ता मैदानात उतरला पाहिजे. २०१९ मध्ये पहिल्यांदात भाजपला संपूर्ण बहुमत मिळाले होते. २०१४ मध्ये शिवसेनेने फक्त दोन जागांसाठी युती तोडली होती”, अशा दावा शहांनी केला. यानंतर शहा पुढे म्हणाले, “शिवसेनेने युती तोडली असे सांगत, आमच्या जागा पाडून आमच्याच पाठीत खंजीर खुपसले”, असे ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतना म्हटले.

उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवा

“मुंबईत फक्त भापचे वर्चस्व असावे, उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याची आता उद्धव ठाकरेंना जागा दाखवण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावावर आणि देवेंद्र फडणवीसांच्या कामावर तुम्ही मते मागतात, जिंकून आलात. तुम्ही जनतेचा विश्वासघात केला आहे”, असे अमित शहा यावेळी म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन; असा आहे मुंबई दौरा

Exit mobile version