Site icon HW News Marathi

विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरेेंयचा पराभव

मुंबई। विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हाती लागण्यास सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचे निकाल जाहीर झाले आहे. यात भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेचे २, काँग्रेस १ विजयी तर १ उमेदवार पराभव झाला आहे. भाजपच्या ५ उमेदवारांचा विजयी झाला आहे.

दरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांचा विजय झाला आहे. भाजपच्या पाचही उमेदवारांचा विजय झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वी करत महविकास आघाडीला टोला लागवला. फडणवीस म्हणाले, “3 पैकी 3 आणि आता 5 पैकी 5 ! राज्यसभा असो की विधानपरिषद विजेता फक्त भाजपाच !॥ जय महाराष्ट्र ॥”

तसेच राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे सचिन अहिर, काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजयी तर चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला आहे.

भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात कलगीतुरा रंगला पाहायला मिळाला. काँग्रेसचे दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभव झाला. आणि प्रसाद लाड यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये त्यांचा विजय झाला. या निवडणुकीत महाविकास आघाडडीची मते फुटल्याची माहिती मिळाली आहे.

विधानपरिषदेतील विजयी उमेदवारांची यादी

राष्ट्रवादी काँग्रेस – रामराजे नाईक निंबाळकर (२९ मते ), एकनाथ खडसे (२८ मते)
शिवसेना – सचिन अहिर (२६ मते), आमशा पाडवी (२६ मते)
भारतीय जनता पार्टी- प्रवीण दरेकर (२९ मते), श्रीकांत भारतीय (३० मते), राम शिंदे (३० मते), उमा खापरे (२७ मते), प्रसाद लाड (२८ मते)
काँग्रेस -भाई जगताप (२६ मते), चंद्रकांत हंडोरे (पराभूत – २२ मते)

Exit mobile version