HW Marathi
News Report व्हिडीओ

६८ वर्षीय वृद्धाची बाबासाहेबांना अनोखी श्रद्धांजली


घायाळ पाखरांना पंख दिले तू, मुक्या वेदनांना शब्द दिले तू असे महामानवाला वंदन करत आपल्या कलेच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्याची अनोखी प्रथा गुरुवारीही धम्मभक्तांना पाहायला मिळाली. बाबासाहेबांच्या प्रतिमेची सुंदर रांगोळी नाशिक येथील ज्येष्ठ रांगोळीकार नारायण चुंबळ यांनी रेखाटली होती.

गुरुवारी 6 डिसेंबरला दादर येथील चैत्यभूमीवर लाखो बुद्ध अनुयायांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले.या प्रचंड जनसमुदायात लहान थोरांपासून सर्वच अनुयायांचा समावेश होता. परंतु गेल्या 10 वर्षांपासून आपल्या कलेमार्फत रांगोळी साकारत अनोखा आदर्श , प्रेरणा अनुयायांपुढे ठेवली आहे. ही रांगोळी बाबासाहेबांची फक्त प्रतिमा नसून आमची प्रेरणा आहे. त्यांनी संविधानातून दिलेला समतेचा संदेश आज मी माझ्या कलेतून पुढे लोकांपर्यंत नेत आहे, असे ६८ वर्षीय नारायण चुंबळ यांनी सांगितले.

या रांगोळीसाठी त्यांनी सकाळी 6 वाजता सुरुवात केली. ३ तासांचा कालावधी या रांगोळीसाठी त्यांना लागला यामध्ये एकूण 15 किलो रांगोळी आणि आदी साहित्याचा वापर करण्यात आला आहे.

Related posts

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk

आता निवड तुमची, प्लास्टिकमुक्त पर्यावरण की ५००० रु. दंड ?

मानसी जाधव

Sabarimala मंदिरात महिलांनी केला प्रवेश

News Desk