Connect with us

व्हिडीओ

सवर्णांना १० टक्के आरक्षण, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

News Desk

Published

on


सवर्णांना देण्यात येणारे १० टक्के आरक्षण विधेयक ९ जानेवारी ला राज्यसभेत मंजूर झाले आहे. देशातील १२४ वी घटनादुरुस्ती असलेले हे विधयक असून या विधेयकास राज्यसभेत १६५ मते विधेयकाच्या बाजुने मिळाली तर ७ मते विधेयकाच्या विरोधात मीळाली आहेत. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत आज भाजपा प्रदेश कार्यालयात आनंद साजरा करण्यात आला

व्हिडीओ

आम्ही आहोत Pad woman

News Desk

Published

on

मासिक पाळी हा विषय आजही आपल्याकडे फार बंदिस्त पद्धतीने मांडला जातो. खेडेगावांमध्ये काय अगदी शहरानंमध्येसुद्धा या विषयावर खुलेपणाने बोललं जात नाही. आजही पॅड वापरण देशातल्या महिलांसाठी चैनेची बाब आहे. कारण १००-२०० रुपयांचे पॅड महिन्याला वापरण्याइतका पैसा त्यांच्याक़डे नाही. शेकडो आश्रमशाळांमध्ये वयात येणाऱ्या मुलींना महिन्याला देण्यात येणारे चार पॅड त्या पाच दिवसाला एक या हिशेबाने वापरतात. परदेशातून येणाऱ्या या पॅडच्या किंमती आजही अवास्तव आहे. आज आपण अशा महिलांना भेटणार आहोत ज्या या सगळ्या मर्यादा झुगारून सॅनिटरी पॅड विषयी किंवा मासिक फक्त बोलत नाहीत तर त्या स्वतः सॅनिटरी पॅड तयार करतात.

 

Continue Reading

व्हिडीओ

Shahir Sambhaji Bhagat | शाहीरांनीही व्हावे डिजिटल

News Desk

Published

on


राजकारणापासुन ते समाजकारणापर्यंत टिकेची झोड उठवणारे लोकशाहीर संभाजी भगत यांनी डिजीटल जग हे खुप प्रचंड मोठ आहे, त्याच्याशी जुळवून घेता आलं पाहीजे असं मत व्यक्त केलं आहे. आजच्या शाहिरांनीही एका हातात डफ तर दुसऱ्या हातात लॅपटॉप घेऊन चाललं पाहीजे अशी भावना आमची प्रतिनीधी आरती मोरे हिच्याशी बोलतांना व्यक्त केली आहे. मुंबईत आयोजित एका Netizens for Democracy कार्यक्रमात ते बोलत होते.

Continue Reading
Advertisement

HW Marathi Facebook

January 2019
M T W T F S S
« Dec    
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  

महत्वाच्या बातम्या